इनर इंजिनिअरिंग :  ताठर नको, लवचिक बना 

इनर इंजिनिअरिंग :  ताठर नको, लवचिक बना 

योगासनांचा सराव करताना तुम्हाला जाणवते की, तुम्ही शारीरिकदृष्ट्या किती ताठर आहात. त्याचप्रमाणे, तुमच्या मनाचा आणि भावनांचा कठोरपणा जाणून घेण्यासाठी तुम्हाला अधिक जागरूकतेची आवश्यकता आहे. आपले विचार आणि भावनांमध्ये खूप कठोर असतो त्याला विश्‍वास असतो की तो परफेक्ट आहे; कारण तो इतर कुठल्याच प्रकारे पाहण्याची, विचार करण्याची किंवा भावनिकदृष्ट्या अनुभवण्याची जागा त्याच्यात ठेवत नाही. तुम्ही अशा माणसाला भेटता तेव्हा तुम्हाला तो हट्टी आहे, असे वाटते. त्याचप्रमाणे तुमच्या प्राण ऊर्जेच्या स्तरावरसुद्धा ताठरता असू शकते. प्राण ऊर्जा खूप प्रवाही असणाऱ्यांची अगदी पहिल्या दिवशी, एका सोप्या योग क्रियेने देखील प्राण ऊर्जेची हालचाल आणि रूपांतरण सुरू होईल. तर इतर व्यक्तींना अनेक दिवस सराव करूनही, काहीच होत नाही असे वाटते. हे सहजपणे प्राण ऊर्जा किती सालस आहे, यावर अवलंबून असते. या वेगवेगळ्या आयामांमधील ताठरता खरोखरच वेगळी नाही, त्या सर्व एकमेकांशी जोडलेल्या आहेत. एका आयामातील ताठरता इतर आयामांमधेही प्रकट होते. 

पतंजलीच्या योग मार्गात, योग ही एक अशी प्रणाली आहे जिथे तुम्ही कोणत्या प्रकारचे मूर्ख आहात, जागरूकतेच्या कोणत्या स्तरावर आहात, कोणत्या प्रकारच्या कर्मबंधनात अडकले आहात याने काहीच फरक पडत नाही. मुक्त होण्यासाठी एक मार्ग तुमच्यासाठी आहेच. कमीत कमी तुम्ही तुमचे शरीर वाकवण्यास तयार असाल, तर आधीच तुम्ही कर्माचा एक बंध मोडला आहे. तुमचे कपाळ गुडघ्यांना टेकत असेल, तर तुम्ही आणखी एक शारीरिक कर्मबंध मोडलाय. हा विनोद नाही; पूर्वी कधीही न केलेल्या अशा व्यक्तीसाठी ही एक मोठी उपलब्धी आहे. ही साधी मर्यादा वय आणि काळानुरूप वाढत गेली असती. कारण असा एक दिवस येईल, जेव्हा तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पूर्णपणे ताठर झालेले असाल. 

हे प्रत्येकासोबत होत आहे. स्वतःच्या आयुष्यात जरा डोकावून पाहा. तुम्ही दहा वर्षांचे असताना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या किती लवचिक होता. वयाच्या विसाव्या वर्षी लवचिकता बऱ्यापैकी कमी झाली आणि वयाच्या तिसाव्या वर्षी बहुतेक ती सगळी नाहीशी झालीये. केवळ शारीरिकच नव्हे, तर मानसिक ताठरपणा देखील अत्यंत तीव्रतेने प्रस्थापित झाला आहे. बहुतेक लोकांसाठी आयुष्य म्हणजे केवळ एक पीछेहाट आहे. जन्माला येताना घेऊन आलेल्या वरदानात तुम्ही वृद्धी केली नाही, तुम्ही त्यांना कमकुवत केले आहे. 

आध्यात्म मार्ग प्रत्यक्षात अगदी सोपा आहे, परंतु तुमच्या सद्यःस्थितीमुळे, तुमच्या व्यक्तिमत्त्वामुळे तो अत्यंत अवघड आणि क्लिष्ट झाला आहे. आध्यात्मिक मार्गावरच्या गुंतागुंत काही त्या मार्गामुळे नसतात. गुंतागुंत आहेत त्या केवळ तुमच्या गोंधळलेल्या सैरभैर मनामुळे. तुमच्या अंतरंगात काहीच हालचाल होत नाही. तुम्ही ताठर बनलात, जणू काही मृत्यूचाच ताठरपणा तुमच्यात अवतरलाय. मात्र, तुमच्या गुरूच्या कृपेला तुमच्या आत प्रवेश दिल्यास मार्ग अगदी सोपा आहे, कारण मार्ग हेच गंतव्य आहे. तुम्ही आता इथे सहज बसलात, तर सर्वकाही अस्तित्वासोबत स्पंदित होऊ लागेल. तुम्ही इथे फक्त बसलात, तर तुमचे सर्वस्व सृष्टीशी स्पंदित होऊ लागेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com