Understanding the Root of Loneliness
सद्गुरू ( इशा फाउंडेशन )
इनर इंजिनीरिंग
प्रश्न : नमस्कार, सद्गुरू. इतक्या लोकांनी वेढलेले असूनही, आपल्याला अजूनही कोणाचे तरी असण्याची, कोणाकडून तरी स्वीकारले जाण्याची, कोणाकडून तरी प्रेम मिळण्याची भावना असते. या असंतोषाला आणि एकटेपणाला आपण कसे सामोरे जावे?
सद्गुरू : तुम्हाला हे ठरवले पाहिजे की, तुमच्या जीवनात स्वातंत्र्य किंवा बंधन यापैकी सर्वोच्च मूल्य कशाचे आहे. समस्या अशी आहे की, बहुतेक लोकांसाठी, जर ते स्वतंत्र असतील, तर त्यांना असे वाटते ते हरवले आहेत. उदाहरणार्थ, जर तुम्ही डोंगराच्या मोकळ्या जागेत आहात आणि तुमच्या आजूबाजूला कोणीही नाही, तर तुम्हाला मोकळेपणा वाटणार नाही - तुम्हाला वाटेल की तुम्ही हरवला आहात.