video:  उपवासासाठीच्या दहा टिप्स

डॉ. मनीषा बंदिष्टी
Monday, 17 February 2020

उपवासाच्या दिवशी चटकदार साबुदाण्याची खिचडी आणि बटाट्याच्या चिप्स खाण्यापेक्षा या दिवशी आपण मनावर नियंत्रण आणायला शिकण्याची गरज आहे.

लाइफस्टाइल कोच :
उपवास करणे हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. या आठवड्यात महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्यापैकी अनेक जण उपवास करतील.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आपल्या पूर्वजांनी आध्यात्मिक आनंदाबरोबरच आरोग्यासाठी विशिष्ट दिवशी उपवास करण्याचा मार्ग स्वीकारला आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत आपण हळूहळू उपवासाद्वारे आपल्या शरीराला, पोटाला देण्याची ही प्रथा उपवासाच्या दिवशीच दुप्पट खाऊन नासवली आहे.

उपवासाच्या दिवशी चटकदार साबुदाण्याची खिचडी आणि बटाट्याच्या चिप्स खाण्यापेक्षा या दिवशी आपण मनावर नियंत्रण आणायला शिकण्याची गरज आहे. उद्याचा दिवस उजाडणारच नाही अशा पद्धतीने अनियंत्रित खाणे बंद केले पाहिजे. उपवासाच्या दिवशी तुम्हाला तंदुरुस्त वाटण्यासाठी खालील गोष्टींचे पालन नक्की करा.

आहार आरोग्यपूर्ण आणि कमी प्रमाणात घ्या. जिभेवर नियंत्रण ठेवा.
सकाळी लवकर जेवणे ही जीवनपद्धती बनवा. 
शरीरातील ‘सुपर हायड्रेटेड’ ठेवा. त्यासाठी पाणी, नारळाचे पाणी, लिंबू पाणी पीत राहा.
साखर गरज पडल्यास खा किंवा त्यासाठी गूळ किंवा मधाचा पर्याय निवडा.
खूप तळलेले, जंक फूड किंवा स्टार्च अधिक प्रमाणात असलेले पदार्थ खाणे टाळा.
जेवणात अधिक प्रमाणात  मीठ घेणे टाळा. 
महत्त्वाचे म्हणजे जेवणात अमरान्थ (राजगिरा), बकव्हिट (कुट्टू), वॉटर चेस्टनट (शिंगाडा) यांचे प्रमाण वाढवा. यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शिअम, लोह, प्रथिने आणि विपुल प्रमाणात प्रोटिन्स असतात. या पदार्थांचा समावेश आहारात वर्षभर केला तरी ते शरीरासाठी फायद्याचे ठरते. 
ऋतूनुसार येणारी व सर्व रंगांची फळे आहारात असणे फायद्याचे ठरते. त्याचबरोबर सूर्यफुलाच्या बिया, जवसाच्या बिया आणि भोपळ्याच्या बियांचाही आहारात समावेश करा. 
उपवासाच्या दिवशी आहारात दह्याबरोबर मोठ्या प्रमाणात बदाम, अक्रोड यांचा समावेश करा. 
हलके व्यायाम, योगासने व ध्यानधारणा केल्यास उपवासाच्या दिवशीही दिवसभर तुम्ही शांत आणि ऊर्जावान राहू शकाल. 

Section MYFA


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ten golden Tips for Fasting