

What is Visceral Fat and Where it Accumulates
Sakal
महेंद्र गोखले ( फिटनेसविषयक प्रशिक्षक )
बनूया फिट...
आपल्या छातीमध्ये आणि ओटीपोटात व्हिसेरल फॅट असते. हे आपले हृदय, किडनी आणि लिव्हर यांसारख्या अनेक अंतर्गत अवयवांभोवती गुंडाळले जाते. व्हिसेरल फॅट ही एक प्रकारची बॉडी फॅट शरीर चरबी आहे- जी आपल्या आत खोलवर असू शकते. त्याचे नाव त्याच्या स्थानावरून मिळते. व्हिसेरा म्हणजे अंतर्गत अवयव आणि टिशू होय. व्हिसेरल फॅट आपल्या ओटीपोटात आणि आपल्या बऱ्याच अंतर्गत अवयवांभोवती गुंडाळलेली असते.