चेतना तरंग; तुम्ही कोणत्या स्वभावाच्या समुदायात आहात ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sri Sri Ravishankar

चेतना तरंग; तुम्ही कोणत्या स्वभावाच्या समुदायात आहात ?

sakal_logo
By
श्री श्री रविशंकर, प्रणेते आर्ट ऑफ लिव्हिंग

या जगात एकाच प्रकारच्या प्रवृत्तीचे लोक एकत्र समुदाय बनवतात. बुद्धिमान लोक एकत्र येतात; मूर्ख लोक एकत्र येतात; आनंदी लोक एक समुदाय बनवतात; महत्त्वाकांक्षी लोक आपला समुदाय बनवतात आणि असंतुष्ट लोक एकत्र समुदाय बनवून आपल्या तक्रारी साजऱ्या करतात! म्हणतात ना, ‘समानशीले व्यसनेषु सख्यम्’ (एकाच प्रकारची पिसे असलेले पक्षी एकत्र कळप करून राहतात!).

असंतुष्ट, असमाधानी लोक एकत्र येऊन समुदाय बनवतात, एकमेकांपाशी तक्रारी सांगत बसून साऱ्या जमावाला आणखीच खड्ड्यात नेतात. एक निराश, नाराज माणूस एका आनंदी माणसाबरोबर राहू शकत नाही, कारण तो आनंदी माणूस त्याच्या तक्रारीच्या सुरांवर नाचत नाही. तुमच्यासारखाच सूर असलेल्या व्यक्तीबरोबर तुम्हाला सुखकारक वाटते. शहाण्या लोकांना मुर्खांची संगत आवडत नाही. मूर्ख लोकांना तर वाटते, की बुद्धिमान लोक माणसांसारखे वागत नाहीत. पण जो खरा ज्ञानी, सुज्ञ आहे, त्याला मात्र आनंदी आणि असमाधानी, शहाण्या आणि मूर्ख अशा सर्व लोकांबरोबर विनातक्रार सहजतेने राहणे शक्य असते. याचप्रमाणे या सर्व प्रवृत्तींच्या लोकांनाही सुज्ञ माणसाच्या संगतीचा त्रास होत नाही.

जरा स्वतःच्या संगतीचे निरिक्षण करून पाहा. तुम्ही असलेला समुदाय तक्रारी करीत असतो की कृतज्ञ असतो? तुमच्या भोवती, तुमच्यासोबत असलेल्या लोकांना प्रवृत्तीच्या उच्च पातळीवर घेऊन जाण्याची जबाबदारी घ्या. हा खरा सत्संग आहे. सत्संग म्हणजे केवळ या, गाणी गा आणि जा, असे नाही.एक ज्ञानी, सुज्ञ माणूस त्या आकाशासारखा असतो, ज्यात सर्व प्रकारचे पक्षी सुखाने भ्रमण करू शकतात.

सर्जनशीलता

सर्जनशीलतेमुळे एक नवी सुरवात होते. तुम्ही सर्जनशील असाल, तर काळाच्या प्रवाहाचा तोचतोपणा बदलू शकाल. सर्जनशीलतेमुळे सर्व काही जिवंत, ताजेतवाने होते. सर्जनशीलतेमुळे उत्साहाची नवी आवर्तने निर्माण होतात. उत्साही असतानाच तुम्ही अस्तित्वाच्या सर्जनशील मूळ तत्त्वाशी एकरूप असता. गहन शांतता ही सर्जनशीलतेची जननी आहे. अतिशय व्यग्र व्यक्ती, चिंतेत असलेली, अपार महत्त्वाकांक्षी किंवा अतिशय आळशी व्यक्ती सर्जनशील होऊ शकत नाही. संतुलित क्रियाकलाप, विश्रांती आणि योगसाधना यांच्या साहाय्याने तुम्ही सर्जनशील आणि कौशल्य यांना तुमच्या जीवनात जागवू शकाल.

loading image
go to top