योगा लाइफस्टाईल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

myfa

योगा लाइफस्टाईल

आपण मागच्या भागातील सूत्रात चित्तावर परिणाम करणाऱ्या पाच कारणांची माहिती घेतली. महर्षी पतंजलींनी आपल्या समस्या सोप्या करण्याचे सूत्रही सांगितले आहे. आपण चित्त विचलित होणाऱ्या पाच कारणांची योग्य पद्धतीने काळजी घेतली आणि ते आपल्या आयुष्यात डोके वर काढत असताना त्याबाबत कायमस्वरूपी जागरूक राहिल्यास चित्त शांत, समाधानी राहण्याची गुरुकिल्ली आपल्याला गवसते. शांत, समाधानी, तसेच समतोल चित्त हे विश्वातील सर्वांत शक्तिशाली शस्त्र आहे. तुम्ही याबाबत सहमत आहात का?

तुमच्या आयुष्यात अशांती निर्माण करणारी कोणती पाच कारणे आहेत ते पाहूयात...

१) प्रमण - योग्य ज्ञान

२) विपर्य -चुकीचे ज्ञान, चुकीच्या संकल्पना

३) विकल्प - कल्पनाशक्ती, काल्पनिक समज

४) निद्रा - झोप

५) स्मृतयः - स्मृती/स्मरणशक्ती

आपण मागच्या सूत्रात वृत्तीबद्दल माहिती घेतली. योगशास्त्र शिकणाऱ्यांसाठी या शब्दाचा योग्य अर्थ समजून घेणे खूप आवश्यक आहे. खूप विचार केल्यावर तुमच्या लक्षात येईल की, योगाचे अंतिम उद्दिष्ट दुसरे-तिसरे काही नसून आपल्या चित्ताच्या प्रकटीकरणाचा संपूर्णपणे नाश करण्याचा भाग आहे. उदाहरणार्थ, सोन्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे आकर्षक दागिने बनविले जातात. परंतु ते दागिने वितळविले किंवा त्याचे रूप नष्ट केल्यास पुन्हा सोन्यातच रूपांतर होते. अगदी त्याचप्रमाणे चित्तातून वेगवेगळ्या वस्तू आणि रचना बाहेर पडतात त्यावेळी त्यांना वेगवेगळी नावे दिली जातात. चित्त आणि जाणीवेचे सर्व रूप काढून टाकले पाहिजे. जेणेकरून जाणिवेला कोणतेही नाव आणि रूपही (निराकार) राहणार नाही. आणि हेच योगाचे अंतिम उद्दिष्ट आहे.

चित्ताचे स्वरूप

आपल्या आजूबाजूला असलेल्या विश्‍वाचा विसर, हे योगाचे एकमेव ध्येय नाही. मात्र, अनेक महत्त्वाकांक्षी व्यक्तींचा तसाच गैरसमज आहे. ते त्यांचे डोळे आणि कान बंद करतात, सर्व बाह्य दृश्ये आणि आवाज विसरतात आणि स्वतःच्या आत डोकावून अद्‍भुत दृश्ये पाहतात. तेही नष्ट करावे लागेल. चित्ताचे स्वरूप जे काही आहे, ते नष्ट करावे लागेल. झोप ही मानसिक स्थिती आहे. त्याच बरोबर समाधीही मानसिक स्थितीच आहे. आपल्याला त्यातून बाहेर पडून त्यावर विजय मिळवता आला पाहिजे. चित्तामध्ये परिवर्तन करण्याचा हा भाग असून, तो करणे खूप गरजेचे आहे. म्हणूनच योगाच्या मार्गावर जाण्यापूर्वी आपण काय करणार आहोत, हे जाणून घेणे क्रमप्राप्त आहे. आपल्याला या मार्गावर योग्यरितीने चालण्यासाठी पतंजली मदत करतात.

आपण जे काही पाहतो, ऐकतो, बोलतो आणि अनुभवतो ते पाच गटात वर्गीकृत केले आहे. हे पाच गट म्हणजे योग्य ज्ञान, चुकीचे ज्ञान, कल्पनाशक्ती, झोप आणि स्मरणशक्ती. प्रत्येक मानसिकस्थिती या पाच परिवर्तनात समाविष्ट केलेली आहे. म्हणजे स्वप्न पाहणे, जागरूक होणे, पाहणे, बोलणे, स्पर्श करणे, मारणे, रडणे, भावना, कृती, अभिप्राय आदी. मुळातच या पाच श्रेणीत सर्वकाही समाविष्ट आहेच. आगामी सूत्रात याविषयी सखोलपणे माहिती घेणार आहोत. आपल्या जीवनात कशा पद्धतीने हाहाःकार करतात याची जाणीवही निर्माण करून दिली जाणार आहे.तोपर्यंत योगात आणि योगासोबत राहा.

loading image
go to top