योगा लाइफस्टाईल : वृत्तयः पञ्चतय्यः क्लिष्टाक्लिष्टाः | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

योगा लाइफस्टाईल : वृत्तयः पञ्चतय्यः क्लिष्टाक्लिष्टाः

योगा लाइफस्टाईल : वृत्तयः पञ्चतय्यः क्लिष्टाक्लिष्टाः

sakal_logo
By
वसुंधरा तलवारे

वृत्तयः - बदल, चढउतार

पञ्चतय्यः पाच प्रकार

क्लिष्ट - वेदनादायी

अक्लिष्ट - आनंददायी

महर्षी पतंजली हे जगातील सर्वांत स्मार्ट आणि हुशार मानसशास्त्रज्ञ होते! त्यांनी हे उलगडून दाखवले की, आपल्या चित्ताच्या कमकुवतपणाचे पाच प्रकार आहेत आणि हे पाच प्रकार वेदनादायी आणि आनंददायी या दोन श्रेणींमध्ये मोडतात. या सूत्राचा अर्थ चित्तामधील चढउतार पाच प्रकाराचे असतात व ते वेदनादायी किंवा आनंददायी असू शकतात. चित्ताच्या आनंददायी वृत्तीही कमकुतपणा कशा असू शकतात, हा प्रश्न तुम्हाला पडेल. तुम्हाला आनंदाची जाणीव करून देणारी गोष्ट चित्तातील चढउतार कसा असू शकते? आपण याआधीच्या सूत्रात पाहिले आहे की, चित्तातील चढउतार थांबतात, तेव्हा आत्मा त्यांच्या खऱ्या स्वरूपात येतो. त्यामुळे जेव्हा आपले चित्त आनंदाने उड्या मारीत असते, तेव्हा तेही चढउतारच असतात. उंचावर गेलेली प्रत्येक गोष्ट खाली येते, हा जीवनाचा नियम आहे. त्यामुळेच आनंदाने नाचण्याचा शेवट काहीतरी दुःखदायक गोष्टीने होतो व ही प्रक्रिया कायमच सुरू राहते. उदा. तुमच्या आवडीच्या आइस्क्रीमचा एक चमचा खा. त्याचा स्वाद जिभेवर आहे, तोपर्यंत तुम्हाला आनंद मिळतो. मात्र, स्वाद संपल्यानंतर तुमच्या चित्तामध्ये आणखी काही तरी मिळण्याची लालसा निर्माण होते आणि ते मिळाले नाही, तर तुम्हाला वेदना होतात. आता अशी कल्पना करा, की आइस्क्रीमच्या पहिल्या चमच्यानेच आनंद दिल्याने तुम्ही १० चमचे आइस्क्रिम खात आहात. तुम्ही दहावा चमचा संपवेपर्यंत अशी शपथ घ्याल, की आता मी आयुष्यात पुन्हा कधीच आइस्क्रिम खाणार नाही! आनंद लवकरच दुःख बनते.

वेदना आनंददायी स्थितीमध्ये लपलेल्या असू शकता आणि आनंद वेदनेच्या स्थितीमध्ये लपलेला असू शकतो. त्यामुळेच योगिक आयुष्य आपल्याला समतोलाच्या स्थितीमध्ये राहण्याचा सल्ला देते आणि आपल्या चित्तामध्ये कधीही आयुष्यात घडणाऱ्या घटनांप्रमाणे चढउतार होऊ नयेत, असे सांगते. त्याऐवजी मनोरंजन, आदर आणि प्रेमामुळे तुमचे आयुष्य कसे वरती जाते आणि त्याचबरोबर खाली येते याचे निरिक्षण करा. योग तुम्हाला आनंदी किंवा दुःखीही न होण्याचा सल्ला देतो. योग प्रत्येक प्रसंगात समतोल साधण्याबद्दल मार्गदर्शन करतो.

चित्ताची वैशिष्‍ट्ये...

चित्त पुढे येऊन नेतृत्व करते, तेव्हा आत्मा मागे राहतो. बदलाचे मूळ चित्तामध्ये आहे, आत्म्यामध्ये नाही. चित्ताची स्वतःची वैशिष्ट्ये आहेत, ज्यातून अनेक समस्या निर्माण करणाऱ्या विचारांची निर्मिती होते व त्यातून पुढे आयुष्यात समस्याही निर्माण होतात. या चित्तामध्ये पाच प्रकारचा कमकुतवपणा असतो व त्यामुळे चढउतार होतात. याबद्दल आपण पुढील सूत्रात विस्ताराने पाहू. विचार जेव्हा मनस्तापाशी जोडलेले असतात, तेव्हा चित्ताची स्थिती वेदनादायी (क्लिष्ट) आहे असे म्हणतात. उदा. जळता कोळसा राखेखाली झाकलेला असतो, तेव्हा तो राखच भासतो. मात्र, त्याला कोणी हात लावल्यास हात भाजतो. जळता कोळसा अगम्य किंवा अक्लिष्ट स्थितीमध्ये असतो. त्वचेला भाजताच तो गम्य किंवा क्लिष्ट बनतो. मनस्ताप वेदनेवर वरचढ असतो, तेव्हा मनाची आनंददायी अवस्था ओळखता येत नाही. मात्र, त्या दोन्ही एकमेकांबरोबर असतात. शरीरसुखातून मिळणारा आनंद बाळांतपणाच्या वेळी वेदनादायी ठरतो व त्यानंतर पालक म्हणून तुम्हाला आनंद, चिंता, दुःख यांच्या आवर्तनांचाही सामना करावा लागतो. थोडक्यात, प्रत्येक आनंददायी वाटणारी गोष्ट खरेतर वेदनादायी आहे. तुमची फॅन्सी कार जुनी होणार आहे व हीच स्थिती तुमचीही होणार आहे.

चित्तातील चढउतारांची पाच कारणे आपण पुढील सूत्रामध्ये पाहू...

loading image
go to top