Myfa : योग ; मन आणि शरीराच्या पलीकडे जाण्याचा मार्ग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

myfa

योग ; मन आणि शरीराच्या पलीकडे जाण्याचा मार्ग

सध्या, तुम्हाला तुमचे शरीर आणि मन असल्याचा एक अनुभव आहे आणि तुमच्या सभोवताली असलेल्या जगाचा अनुभव तुम्ही घेऊ शकता, कारण तुमची पाच इंद्रिये कार्यरत आहेत. तुम्ही पाहू, ऐकू शकता, गंध, चव घेऊ शकता आणि स्पर्श करू शकता. केवळ याच मार्गांनी तुम्ही जग जाणता, तुमचे शरीर आणि मन. जे काही तुम्ही जीवन म्हणून जाणता त्याबद्दलचा तुमचा सबंध अनुभव तुम्हाला केवळ या पंचेंद्रियांच्या आकलनातून मिळतो आहे.

या पंचेंद्रियांच्या माध्यमातून झालेले आकलन हे विश्वासार्ह नाही, कारण हे आकलन केवळ इतर कशाच्या तरी तुलनेतून झालेले आहे. जे काही तुम्ही तुलना करून आकलन करता ते आकलन नाही, ते एक वास्तविकतेचे विकृत स्वरूप आहे. उदाहरणार्थ, जर तुम्ही ६ फूट उंच असाल, तर तुम्ही एका उंच व्यक्तीप्रमाणे चालता, एका उंच व्यक्तीप्रमाणे विचार करता आणि एका उंच व्यक्तीसारखे तुम्हाला वाटते. समजा तुम्ही अशा एका दुसऱ्या समाजात गेलात जिथे प्रत्येक जण ८ फूट उंच आहे, तर अचानक तुम्ही एका बुटक्या व्यक्तीसारखे चालाल, एका बुटक्या व्यक्तीसारखे विचार कराल आणि एका बुटक्या व्यक्तीप्रमाणे तुम्हाला वाटेल. म्हणून जे आकलन तुम्हाला होते, ते इतर कशाच्या तरी तुलनेत होते, ते केवळ वास्तवाचे एक विकृत स्वरूप आहे.

मनसुद्धा एक ज्ञानेंद्रिय आहे. तुमचे मन हे केवळ एक पात्र आहे, एक साठवण्याची जागा जिथे तुमचे सर्व आकलन साठवून ठेवले जाते. तर या मनावर ज्ञानेंद्रियांच्या आकलनाचे राज्य आहे, तरीही ज्ञानेंद्रियांचे आकलन हे विश्वासार्ह नाही, तर यासाठीच योगामधील पहिली पायरी ही यांच्या पलीकडे जाण्याबद्दल आहे. बुद्ध शब्दाचा अर्थ, ‘बु’ म्हणजे बुद्धी किंवा बुद्धिमत्ता, ‘द्ध’ म्हणजे जो बुद्धीच्या वर आहे. जो त्याच्या बुद्धीच्या वर आहे तोच बुद्ध. आणि योग म्हणजे सुद्धा तेच – अर्थात जो त्याच्या मनाच्या पलीकडे आहे. जो त्याच्या मनाचा आता एक भाग राहिला नाही तो बुद्ध आहे; त्याचे मन त्याच्यासाठी आता फक्त एक साधन झाले आहे... त्याच्या वापरासाठी.

तुम्ही जे काही करायचे आहे, जीवनाचा हवा तो मार्ग तुम्ही निवडा; काही फरक पडत नाही, पण तुमच्या मनावर आणि शरीरावर तुमचे पूर्णपणे नियंत्रण असणे गरजेचे आहे, त्याबद्दल काहीच वाद नाही. तुमच्या मनावर आणि शरीरावर तुमचे पूर्ण नियंत्रण आणि त्यांची खरी समज तेव्हाच होऊ शकते, जेव्हा तुम्ही त्यांपासून अंतर निर्माण करू करता, जेव्हा तुम्ही त्यांच्याशी तुमची ओळख बांधत नाही.

उदाहरणार्थ, मानव या ग्रहावर हजारो वर्षांपासून जगत आला आहे. अगदी काही शंभर वर्षांपूर्वीपर्यंत हा वाद चालू होता, की हा ग्रह गोल आहे की सपाट. अगदी आजही, जे काही तुम्ही वाचले आणि ज्यावर तुमचा विश्वास आहे त्या सर्व निरर्थक गोष्टी बाजूला ठेवा, आणि जरा लक्षपूर्वक पाहा, तुमच्या जीवनाच्या अनुभवात जेव्हा तुम्ही बाहेर चालता, तुम्हाला काय वाटते, हा ग्रह गोल आहे की सपाट? तुमच्या अनुभवात अजूनही सपाटच आहे, नाही का? हा वाद तसाच पुढे चालू राहू शकला असता. पण जेव्हा माणसाने आकाशात भरारी घेण्यास सुरुवात केली, तो वर गेला आणि खाली पहिले आणि मग तेव्हा काही शंकाच उरली नाही, हे अगदी स्पष्ट झाले की, हा ग्रह गोल आहे. तो वाद पूर्णपणे मिटला. त्याचप्रमाणे, जर तुम्ही तुमचे मन आणि शरीराच्या पलीकडे कसे राहायचे हे जाणले, केवळ तेव्हाच तुम्हाला या मनाचे आणि शरीराचे खरे स्वरूप लक्षात येईल.

Web Title: Yoga The Way To Go Beyond Mind And Body

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :myfa
go to top