Nagpur: पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना! अनैतिक संबंधांच्या संशयातून पतीकडून पत्नीची डोक्यावर हातोडी मारून हत्या

Nagpur
Nagpuresakal

नागपूर: पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय घेत तिच्या डोक्यात हातोडी मारून खून केला. यानंतर पतीनेही गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना रविवारी (ता.२) सकाळी सदर पोलिस ठाण्यातंर्गत दुर्गा माता मंदिर परिसरात उघडकीस आली.

सोनिया राजेश मंडाले (वय ३७, मॉईल क्वार्टर, दुर्गामाता मंदिर,सदर) असे मृत पत्नीचे नाव असून राजेश खेमराज मंडाले (वय ५१) असे आत्महत्या करणाऱ्या पतीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया मॉईल येथे लॅब असिस्टंट पदावर काम करीत होती.

Nagpur
Nagpur Accident: नागपूर हादरलं! तलावात बुडून पाच तरुणांना जलसमाधी; मोहगाव झिल्पी येथील घटना

राजेशला कॅन्सर झाला असल्याने तो घरीच होता. मुळचा रामटेक येथील चारगाव येथील रहिवासी असलेला राजेश याचे सोनियाचे काम करीत असताना प्रेमसंबंध जुळले. त्यातून पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यावर सोनियासोबत १४ वर्षांपूर्वी त्याने प्रेमविवाह केला होता. त्यामुळे सोनियाच्या घरच्यांनी तिच्याशी संबंध तोडले होते.

राजेशला सोनियापासून वैष्णवी नावाची मुलगी असून ती नववीत शिकते. पहिल्या पत्नीपासून त्याला दोन मुले आहेत. दरम्यान राजेश यांना चार वर्षांपूर्वी कॅन्सर आजाराने ग्रासले. त्याचे उपचार सुरू होते.

साडेतीन महिन्यांपूर्वी मंडाले कुटुंब रामटेक सोडून मॉईलच्या सदर येथील क्वार्टरमध्ये आले होते. दरम्यान तो घरीच असायचा.

पत्नी कामावर जात असताना, तिचे दुसऱ्या कुणासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय त्याला होता. त्यातून त्यांची दररोज भांडणेही व्हायची. शनिवारी रात्रीच्या सुमारास दोघेही खोलीत गेले. त्यानंतर त्याने पत्नीच्या डोक्यात हातोडीने प्रहार करीत तिचा खून केला. नंतर स्वतः गळफास घेत आत्महत्या केली.

रविवारी सकाळी मुलगी वैष्णवी दहा वाजता उठली. तिने वडिलांच्या खोलीचे दार उघडले. तिला आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली तर वडिलांनी गळफास घेतल्याचे दिसून आले.

Nagpur
Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर सुविधांचा अभाव! दोनशे किमीमध्ये नाही अग्निशमन केंद्र; वाहन जळाल्यास प्रवाशांचा मृत्यू अटळ

तिने याची माहिती मामा अमित अशोक यादव (वय ३३ रा.वाहिटोला, रामटेक) यांना दिली. त्यांनी घर गाठून पोलिसांना कळवले.

‘तिने माझा मृत्यूची वाट बघितली नाही’

राजेशने लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटमध्ये त्याबाबत उल्लेख करीत ‘तिने माझा मृत्यूची वाट बघितली नाही’ असे लिहून ठेवले. यावेळी मी मेल्यानंतर घराची रजिस्ट्री आणि कुणाचे किती देणे आहे याचाही उल्लेख केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com