नांदेड : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सोमवारी (ता. २६) होणाऱ्या नांदेड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. काही प्रमुख मार्गांवरील वाहतूक पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या कॅन्व्हॉय मार्गावर कोणताही अडथळा होऊ नये व शांतता व सुव्यवस्था राखली जावी, यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे.