Rabies Vaccination : १४७ ग्रामस्थांनी घेतला अँटीरेबीजचा दुसरा डोस
Health Department : साखरा तांडा (ता. सेनगाव) येथे पिसाळलेल्या कुत्र्याने विहिरीतील पाणी पिल्यामुळे घाबरलेल्या गावकऱ्यांना आरोग्य विभागाने अँटी रेबीज लस देण्याची मोहीम सुरू केली आहे.
हिंगोली : साखरा तांडा (ता. सेनगाव) येथे पिसाळलेला कुत्रा पडलेल्या विहिरीतील पाणी पिल्यामुळे घाबरलेल्या गावकऱ्यांचे आरोग्य विभागाने लसीकरण सुरू केले आहे. मंगळवारी (ता. २१) सकाळी १४७ गावकऱ्यांना अँटी रेबीजचा दुसरा डोस देण्यात आला आहे.