Nanded News : अंबील प्यायल्यानं नायगावात दीडशे जणांना विषबाधा; नांदेडमध्ये १२ रुग्णांवर उपचार सुरू

जेवल्यानंतर सायंकाळी लहान मुलांसह १५० नागरिकांना मळमळ, पोटदुखी सुरू झाल्याने काहींना उपचारासाठी नायगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
150 people poisoned in Naigaon by drinking Ambil Treatment of 12 patients started in Nanded
150 people poisoned in Naigaon by drinking Ambil Treatment of 12 patients started in NandedSakal

नायगाव : तालुक्यातील लालवंडी (जि. नांदेड) येथे भंडाऱ्याच्या जेवणात अंबील पिल्याने विषबाधा झाल्याची घटना बुधवारी (ता. १५) सायंकाळी घडली. जेवल्यानंतर सायंकाळी लहान मुलांसह १५० नागरिकांना मळमळ, पोटदुखी सुरू झाल्याने काहींना उपचारासाठी नायगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

तर मांजरम प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक गावातच उपचार करत असून, गंभीर १२ रुग्णांना पुढील उपचारासाठी नांदेडला पाठविण्यात आले आहे. लालवंडी येथे बुधवारी शेतकऱ्याच्या शेतातील महादेव मंदिराचा भंडारा होता.

महाप्रसादाचा गावातील शेकडो नागरिकांनी लाभ घेतअंबीलही पिले. सायंकाळच्या सुमारास मळमळ, उलट्या व पोट दुखणे सुरू झाले. त्यामुळे अनेकजण तातडीने नायगावच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला, रुग्णांपेक्षा नातेवाइकांची मोठी गर्दी झाली होती. त्याचबरोबर रात्री उशिरा आणखी रुग्ण भरती झाले.

अधीक्षकांसह अन्य अधिकारी गायब

नायगाव ग्रामीण रुग्णालयात एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण दाखल होत असताना केवळ दोनच वैद्यकीय अधिकारी उपचार करण्यासाठी उपलब्ध होते. वैद्यकीय अधीक्षकांसह अन्य अधिकारी गायब असल्याचे दिसून आले. दाखल रुग्ण तळमळत असताना उपचार वेळेवर मिळत नव्हते.

उपचार करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी दोन आणि रुग्ण दीडशेहून अधिक, यामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. गुरुवारी सकाळी वरिष्ठ अधिकारी डॉ. विद्या जैन यांनी गंभीर रुग्णांना नांदेडला हलविण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com