नांदेड येथील 16 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सोडले घरी; 22 कोरोना बाधितांची भर तर एकाचा मृत्यू

प्रल्हाद कांबळे
Tuesday, 17 November 2020

आजच्या एकूण 508 अहवालापैकी 482 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या आता 19 हजार 662 एवढी झाली असून यातील 18 हजार 701 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकूण 327 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 17 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.
 

नांदेड : येथे सोमवारी (16 नोव्हेंबर) रोजी सायं.पाच वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 16 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 22 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे दोन तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 20 बाधित आले.
 
आजच्या एकूण 508 अहवालापैकी 482 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या आता 19 हजार 662 एवढी झाली असून यातील 18 हजार 701 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकूण 327 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 17 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.
 
आज रोजी प्राप्त अहवालानुसार एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शनिवार 14 नोव्हेंबर 2020 रोजी सिडको नांदेड येथील 39 वर्षाच्या एका महिलेचा खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 541 झाली आहे.
 
आज बरे झालेल्या बाधितांमध्ये खाजगी रुग्णालय 5, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 4, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 7 असे एकूण 16 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 95.12 टक्के आहे.
 
आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात दोन बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 14, अर्धापूर तालुक्यात 1, बिलोली 2, नांदेड ग्रामीण 1, भोकर 1, किनवट 1 असे एकुण 20 बाधित आढळले.
 
जिल्ह्यात 327 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 33, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 26, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे 15, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 68, मुखेड कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 6, किनवट कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 9, देगलूर कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 12, हदगाव कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 7, लोहा कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 1, बिलोली कोविड केअर सेंटर व गृह विलगीकरण 1, भोकर कोविड केअर सेंटर व गृह विलगीकरण 14, अर्धापूर तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 8, धर्माबाद तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 4, कंधार तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 3, खाजगी रुग्णालय 22, औरंगाबाद येथे संदर्भीत 2, अकोला येथे संदर्भीत 1, लातूर येथे संदर्भीत 4, हैदराबाद येथे संदर्भीत1 आहेत. 
 
सोमवार 16 नोव्हेंबर 2020 रोजी 5.30 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 165, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 82 एवढी आहे.
 
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 28 हजार 501
निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 5 हजार 331
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 19 हजार 662
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 18 हजार 701
एकूण मृत्यू संख्या- 541
उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 95.12 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-2
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 379
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 327
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले- 17.
 
फटाक्यांच्या धुरामुळे कोविड बाधित रुग्णांना व श्वसनाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींना त्रास अधिक वाढवू शकतो. त्यामुळे ही दिवाळी फटाके विरहित दिवाळी म्हणून साजरी करावी. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. 

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The 16 corona patient in Nanded have been released home after medical treatment