esakal | अर्धापुरात पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचे 19 लाख वसूल, अपात्र शेतक-यांनी तात्काळ पैसे परत करण्याचे आवाहन

बोलून बातमी शोधा

file photo}

या योजनेसाठी काही अटी व नियम लावण्यात आल्या आहेत. या योजनेचा लाभ घेतलेला पण अपात्र असलेल्या शेतक-यांकडून पैसे वापस घेण्यात येत असून तालूक्यात सुमारे 19 लाख जमा करण्यात आले आहेत अशी माहिती महसुल प्रशासनाने केली.

अर्धापुरात पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचे 19 लाख वसूल, अपात्र शेतक-यांनी तात्काळ पैसे परत करण्याचे आवाहन
sakal_logo
By
लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : केंद्र शासनाने देशातील शेतक-यांना अर्थिक मदत करण्यासाठी दोन वर्षापूर्वी पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना सुरू केली.या योजनेसाठी काही अटी व नियम लावण्यात आल्या आहेत. या योजनेचा लाभ घेतलेला पण अपात्र असलेल्या शेतक-यांकडून पैसे वापस घेण्यात येत असून तालूक्यात सुमारे 19 लाख जमा करण्यात आले आहेत अशी माहिती महसुल प्रशासनाने केली. तसेच अपात्र शेतक-यांनी तात्काळ पैसे भरावे आसे आवाहन करण्यात आले आहे.

केंद्र शासनाने दोन वर्षापूर्वी शेतकरी सन्मान योजना सुरु केली. या योजनेत शेतक-यांना एका वर्षांत सहा हजार मदत करण्यात येते. ही योजना गेल्या लोकसभेच्या निवडणूकीच्य पुर्वी योजना जाहीर करून तातडीने आमलबजानी करण्यात आली. त्यामुळे खुप मोठ्या प्रमाणात आपात्र शेतकतक-यांना लाभ मिळू लागला. ही बाब शासनाच्या निदर्शनास आल्यावर आपात्र लाभार्थ्यांकडून पैसा वसूल करण्याची मोहीम हाती घेण्यात आली.

या योजना सुरू करतांना काही आटी घालण्यात आल्या होत्या. यात आयकर भरणारे शेतकरी, पेन्शनर, एकाच कुटूंबातील एकाला लाभ, आदी अटींचा समावेश होता. या व ईतर अटींचा उल्लंघन करणा-या शेतक-यांना योजनाचा लाभ गेल्या दोन वर्षापासून लाभ मिळत असल्यामुळे शासनाचे कोट्यवधींचे नुकसान होत आसल्यामुळे वसुली मोहीम सुरु करण्यात आली आहे.

अर्धापूर तालुक्यातील गावातील आपात्र शेतकरी लाभार्थ्यांकडून पैसा परत घेण्याची मोहीम सुरु करण्यात आली. तालुक्यातील मंडळ अधिकारी, तलाठी, अव्वल लिपीक यांनी सतत पाठपुरावा करून शेतक-यांना पैसा भरण्याचे आवाहन केले. या आवाहनाला तालुक्यातील शेतक-यांनी प्रतिसाद दिली. या योजनेचे सुमारे 19 लाख 22 हजार वसुल करण्यात आले आहेत.

तालुक्यातील अपात्र शेतकरी लाभार्थ्यांकडून पैसा परत घेण्याचे शासानाच्या सुचना असून त्याप्रमाणे वसुली करण्यात येत आहेत. तसेच आपात्र  लाभार्थ्यांना पैसा पाठविण्याचे बंद करण्यात आले आहे. तसेच आपात्र लाभार्थ्यांनी पैसा वापस करावे आसे आवाहन नायब तहसीलदार मारोती जगताप यांनी केले आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे