esakal | नांदेड जिल्ह्यात बुधवारी १९६ रुग्ण पॉझिटिव्ह 
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

जिल्हाभरात अँन्टीजेन रॅपीड टेस्ट सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती व संशयित यांचे स्वॅब घेतले जात आहेत. या तपासणीतून मोठ्या प्रमाणावर बाधीत रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे आवघ्या काही दिवसात जिल्ह्यातील रुग्ण संख्या अडीच हजारापेक्षा जास्त झाली. 

नांदेड जिल्ह्यात बुधवारी १९६ रुग्ण पॉझिटिव्ह 

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड : बुधवारी (ता. पाच) प्राप्त झालेल्या अहवालात १९६ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर दिवसभरात सहा जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, ७५ कोरोना बाधित रुग्ण औषधोपचाराने बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली. 

मंगळवारी (ता. चार) प्रलंबित अहवालापैकी ९३३ जणांचा अहवाल प्राप्त झाला. यामध्ये ६१९ निगेटिव्ह तर १९६ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. जिल्हाभरात अँन्टीजेन रॅपीड टेस्ट सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे प्रयोगशाळेकडून दिवसातून दोन ते तीन वेळेस अहवाल दिले जात आहेत. यात मोठ्या प्रमाणावर रुग्णांची संख्या वाढत आहे. बुधवारी आढळुन आलेल्या १९६ बाधितामुळे जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या दोन हजार ६९२ इतकी झाली आहे. तर ७५ बाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या जिल्हाभरात एक हजार ४४४ बाधित रुग्णावर औषधोपचार सुरु असल्याचे डॉ. भोसीकर यांनी सांगितले.

हेही वाचा- Video - ॲन्टीजेन तपासणीस नांदेडमध्ये प्रतिसाद ​

सहा जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू 

मंगळवारी (ता.चार) नायगाव तालुक्यातील एक महिला (वय ५०), साठेनगर मुदखेड येथील पुरुष (वय ६१) यांच्यावर विष्णुपुरीच्या शासकीय रुग्णालयात तर किनवट तालुक्यातील इस्लापूर येथील पुरुषाचा (वय ६०) किनवट कोविड केअर सेंटर येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. बुधवारी (ता.पाच) शिवाजी चौक लोहा येथील पुरुष (वय ७४), वाघी रोड नांदेड येथील पुरुष (वय ५२) नांदेड जिल्हा रुग्णालय, नांदेडच्या शिवदत्तनगर येथील पुरुष (वय ६४) यांच्यावर शासकीय रुग्णालय येथे उपचर सुरु असताना मृत्यू झाला. आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित मृत व्यक्तींची संख्या १०३ एवढी झाली आहे. 

हेही वाचा- कुख्यात विक्की चव्हाण याच्यावर होते ‘एवढे’ गुन्हे,वाचा सविस्तर

५७ रुग्णांची प्रकृती गंभीर 

बुधवारी नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील पाच, हदगाव कोविड केअर सेंटर दहा, देगलूर कोविड केअर सेंटर २०, खासगी रुग्णालय आठ, मुखेड कोविड केअर सेटर २०, धर्माबाद कोविड केअर सेटर दोन, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील दहा असे एकूण ७५ कोरोना बाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. उपचार सुरु असलेल्या रुग्णांपैकी ३७ महिला व १९ पुरुष अशा एकुण ५७ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. 

नांदेड कोरोना मीटर 

सर्व्हेक्षण - एक लाख ४९ हजार ६३१ 
घेतलेले स्वॅब - १८ हजार १६८ 
निगेटिव्ह स्वॅब - १४ हजार १५६ 
एकूण पॉझिटिव्ह रुग्ण - दोन हजार ६९२ 
आज बुधवारी पॉझिटिव्ह रुग्ण - १९६ 
आज बुधवारी मृत्यू - सहा 
एकूण मृत्यू - १०३ 
आज बुधवारी रुग्णालयातून घरी गेलेले रुग्ण - ७५ 
आत्तापर्यंत रुग्णालयातून घरी गेलेले रुग्ण - एक हजार १३२ 
रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण - एक हजार ४४४