नांदेड जिल्ह्यातील रस्त्यांसाठी केंद्राकडून १९७ कोटींचा निधी- प्रताप पाटील चिखलीकर

केंद्रीय राज्य मार्ग निधी अंतर्गत जिल्ह्यातील रस्त्यांसाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी १९६ कोटी २० लाख ३४ हजार रुपयांचा निधी दिला आहे, अशी माहिती खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
प्रताप पाटील चिखलीकर (खासदार)
प्रताप पाटील चिखलीकर (खासदार)

नांदेड : केंद्रीय राज्य मार्ग निधी अंतर्गत जिल्ह्यातील रस्त्यांसाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी १९६ कोटी २० लाख ३४ हजार रुपयांचा निधी दिला आहे, अशी माहिती खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

जिल्ह्यातील रस्ते सुंदर व्हावेत, या रस्त्यावरुन सुखकर प्रवास व्हावा, यासाठी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यासह किनवटचे आमदार भिमराव केराम, मुखेडचे आमदार डाॅ. तुषार राठोड, आमदार राजेश पवार यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. त्यानुसार निधी मिळाला असून, त्यातून जिल्ह्यातील विविध तालुक्यातील १३ मुख्य रस्त्यांची कामे होणार आहेत.

हेही वाचा - वसमतमध्ये बंदचे आदेश डावलणाऱ्या आडत व्यापाऱ्यांना ४३ हजारांचा दंड

या निधीतून अर्धापूर तालुक्यातील पाटनूर- जाभरुण- दाभड- बामणी- कामठा- मालेगावदेगाव कु-हाडा रस्ता, भोकर तालुक्यातील गारगोवाडी- नसलपूर- नेकाली ब्रिज-भुरभुशी- किनी- नांदा- गोरणटवाडी- दिवशी तांडा- कांडली- लगळूद- रावणगाव- मातूळ- खडकी ते शिवनगर तांडा रस्ता, नांदेड तालुक्यातील विष्णूपुरी- पांगरी- असदवन- गोपाळचावडी- तुप्पा- मालेगाव - निळा- तळणी- रहाटी- जैतापूर रस्तारस्ता, बिलोली तालुक्यातील कुंटूर-कुंभारगाव- कोंडलवाडी- नागणी ते राज्य रस्ता, देगलूर तालुक्यातील देगलूर- करडखेड- हानेगाव ते कर्नाटक सिमा रस्ता, हिमायतनगर तालुक्यातील छोटा पुल अर्धापूर- तामसा- आष्टी- सोनारी- हिमायतनगर- सावना- जिरोना- शिवणी ते निर्मल आंध्रप्रदेश सिमा रस्ता.

अर्धापूर तालुक्यातील सोनाळा- रोडगी- पांगरी- लोणी बु.- लोणी खु.- बारसगाव- येळेगाव- देगाव- पिंपळगाव- शेळगाव- कामठा रस्ता (बारसगाव पाटी ते भाऊराव सहकारी साखर कारखाना), देगाव- जवळा (पाठक)- जवळा मुरार- निवघा- राज्य रस्ता क्र.२६१ पर्यंत रस्ता (राज्य रस्ता क्र.२६१ ते भाऊराव सहकारी साखर कारखाना), किनवट तालुक्यातील तामसा- हिमायनगर- सवना -जिरोणा- कोसमेट-शिवणी-गोडजेवली ते तेलंगाणा राज्य सिमा रस्ता, कंधार व नायगाव तालुक्यात बाचोटी-मंगलसांगवी-सावळेश्वर - चिखली- हळदा -कोलंबी- गोदमगाव-लालवंडी- नायगाव रस्ता, नायगाव तालुक्यातील उमरी-बेळगाव- कुंटूर- नायगाव राज्य रस्ता, मुखेड तालुक्यातील हणमंतवाडी- कुरुळा- उमरगा- खोजा (दिग्रस) गुंटूर- वर्ताळा- वसंतनगर- पांडूर्णी या रस्त्यांची कामे होणार असल्याचे खासदार चिखलीकर यांनी कळवले आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com