esakal | वसमतमध्ये बंदचे आदेश डावलणाऱ्या आडत व्यापाऱ्यांना ४३ हजारांचा दंड

बोलून बातमी शोधा

वसमत फोटो
वसमतमध्ये बंदचे आदेश डावलणाऱ्या आडत व्यापाऱ्यांना ४३ हजारांचा दंड
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वसमत : सकाळी ११ नंतर कडक लॉकडाउनचे आदेश असतानाही दुकाने उघडण्याचा मोह आवरता न आलेल्या आडत दुकानदारावर गुरुवार (ता. २२) नगर परिषद व पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत ४३ हजार रुपयांचा दंड वसूल केला.

याबाबत माहिती अशी की, तालुक्यासह शहरात कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरीक भयभीत आहेत. शहरातील शासकीय कोवीड केंद्रात बाधीत रुग्णांची गर्दी होत आहे. तर अनेक रुग्णांना बेड न मिळाल्यामुळे खाजगी किंवा इतर जिल्ह्यांत उपचारासाठी जावे लागत असल्याचे विदारक चित्र आहे. कोरोना संसर्गाची चेन तोडण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत जिवनावश्यक व शेती संबंधीत दकाने उघडण्याचे आदेश दिले आहेत. तसेच संबंधित दुकानदारांना आरटीपीसीआर तपासणी बंधनकारक केली आहे.

हेही वाचा - माहूर वनपरिक्षेत्रांतर्गत पार्डीत बिबट्याचा संशयास्पद मृत्यू

परंतू शहरातील अनेक दुकानदार जिल्हा प्रशासनाच्या आदेशाचे पालन करताना दिसत नाहीत. परिणामी कोरोना संसर्ग वाढण्याची भीती नागरीकामधून व्यक्त केली जात होती. गुरुवारी नगर परीषद व पोलिस पथकाने आदेश डावलून सकाळी ११ नंतरही दुकाने सुरु ठेवणाऱ्या आडत दुकानदारांवर कारवाई करीत ४३ हजार रुपयांचा दंड वसूल केला. यावेळी संयुक्त कारवाईत सहाय्यक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, राजू सिद्दिकी, सुनील गोरलावड, यासह होमगार्ड तसेच नगरपरिषदेचे कर्मचारी भगवान कुदळे, श्री मस्के, श्री भिसे, श्री डहाळे यांची उपस्थिती होती.

संपादन- प्रल्हाद कांबळे