
नांदेड : स्थानिक गुन्हे शाखेत (एलसीबी) नियुक्तीसाठी प्रक्रिया पार पडली. लेखी परीक्षा, प्रत्यक्ष मुलाखत आणि सेवा अभिलेखांची तपासणी अशा टप्प्यांनंतर २० पोलिस कर्मचाऱ्यांची एलसीबीसाठी अंतिम निवड करण्यात आली असून, जिल्हा पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती अंमलात आणण्यात आली.