esakal | २०० खाटांचे केअर सेंटर लवकरच सुरू होणार
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

या परिसरात नव्याने १४५० लाख एवढा मोठा निधी खर्च करून भव्य असी रुग्णालयाची इमारत बांधण्यात आली आहे. २०१३ पासून या इमारतीचे काम सुरू झाले होते.

२०० खाटांचे केअर सेंटर लवकरच सुरू होणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : येथील श्री गुरुगोविंदसिंग मेमोरिअल शासकीय रुग्णालयात नव्याने बांधकाम करण्यात आलेल्या इमारतीमध्ये २०० खाटांचे कोवीड केअर सेंटर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली. 

शहराच्या मध्यवर्ती भागात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या शेजारी श्री गुरू गोविंदसिंगजी स्मारक शासकीय रुग्णालय आहे. या परिसरात नव्याने १४५० लाख एवढा मोठा निधी खर्च करून भव्य असी रुग्णालयाची इमारत बांधण्यात आली आहे. २०१३ पासून या इमारतीचे काम सुरू झाले होते. ते काम आता पूर्णत्वास आले आहे. जुन्या रुग्णालयाच्या जागी असलेल्या इमारती बांधकामामध्ये तळमजला पहिला मजला असे दोन्ही मिळून साडेचार हजार चौरस मीटरचे बांधकाम करण्यात आले आहे.

हेही वाचाअक्षदा पडण्याअगोदर नवदाम्पत्यानी याला दिले महत्व

सर्व यंत्रणेसह इमारत सज्ज

इमारत तयार करताना साडे तीन मीटर खोदकाम त्या खोदकामात निघालेली माती शहराबाहेर नेऊन टकणे, खडीचे 50 सेंटिमीटर जाडीचे थर तयार करणे, काँक्रीट तयार करणे, फाउंडेशन सव्वा मीटर जाडीचा तयार करणे, आरसीसी फ्रेम तयार करणे, आरसीसी स्लॅप तयार करणे, वीट बांधकाम व गिलावा करणे, सागवानी लाकडाचे चौकटी, दरवाजे व खिडक्या बसवणे, आरसी फ्रेम, पीव्हीसी डोअर, ॲल्युमिनियम डोअर व खिडक्या बसविणे, स्टेनलेस स्टील, रेलिंग बसविणे, कोटा फरशी, ग्रॅनाईट, सिरामिक टाइल्स, जल व मलनिस्सारणची कामे, युरोपियन टाईप शौचालय, पाण्याची टाकी आवश्यकता जोडणी तयार करणे, गळती प्रतिबंधक उपाय योजना करणे, इमारतीला आतून-बाहेरून रंगरंगोटी करणे, सिलिंगचे काम आधी या बांधकामात करण्यात आले आहे.

१२ कोटी ९३ लाख ३७ हजार ४४३ रुपयांच्या निधी

या कामासाठी प्रशासकीय निधीतून १२ कोटी ९३ लाख ३७ हजार ४४३ रुपयांच्या निधीला मंजुरी प्राप्त झाली आहे. यातील २०० खाटांचे इमारतीचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले आहे. त्यात पॅथॉलॉजी व रेडिओलॉजी, रजिस्ट्रेशन, प्रशासन, बाह्यरुग्ण विभाग, इंजेक्शन व ड्रेसिंग रूम, डायलिसिस आणि प्रतीक्षागृह व प्रसाधनगृह असे २२७५ चौरस मीटरमध्ये तळमजला. पहिल्या मजल्यावर महानगर रक्तपेढी, बाह्यरुग्ण विभाग, फिजिओथेरपी असे बांधकाम झाले आहे. सध्या तयार असलेल्या या इमारतीतील २०० खाटाचे कोवीड सेंटर उभारण्याच्या सुचना पालकमंत्री अशोक चव्हाण देणार असल्याचे सांगण्यात आले. 

loading image