
नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे विवाहसोहळ्यापूर्वी काढले पोस्टाचे बँक खाते, नवरा नवरीने ठरवले पहिले पोस्ट बँक खातेनंतर सप्त फेरे.
नांदेड : जिल्ह्यातील माहूर येथे सोमवारी (ता. १५) केंद्रे परिवारात लॉकडाउनमध्ये मोजक्या पाहुणे व मित्र परिवारात शुभ विवाह सोहळा साजरा करण्यात आला होता. हा शुभ विवाह चि. एस. डी. केंद्रे व चि. सौ. का.वैष्णवी मुंडे यांचा होता. यातील नववर केंद्रे हे केंद्र सरकारचे कर्मचारी आहेत. या नवदाम्पत्याने सप्त फेऱ्या आगोदर पोस्ट बँकेचे प्रथम खाते उघडूनच नंतर लग्न करण्याचे ठरवले.
नवरदेव केंद्रे यांनी नवरी वैष्णवी यांचा आधार कार्ड क्रमांक व मोबाईल क्रमांक घेऊन पोस्ट बँकेला जोडला व काही सेकंदात पोस्ट बँकेचे डिजिटल बचत खाते नवरीने उघडून QR कार्ड डिजिटल पास बुक लग्न मंडपात देण्यात आले.
नवरा व नवरीने पोस्ट बँक लाभ घेतल्याने आलेले वऱ्हाडी मंजडळीनी देखील पोस्ट बँकेचे खाते उघडून घेतले. पोस्ट बँकेची खाते उघडण्याचे पूर्ण कार्यक्रम झाल्याने नवरा व नवरीने आपल्या आयुष्यातील जोडीदार सोबत सप्त फेऱ्या मारून नवीन आयुष्याला सुरुवात केली.
डाक विभागाकडून शुभेच्छा
नांदेडचे डाक अधिक्षक शिवशंकर लिंगायत यांनी चलभाषद्वारे वधू व वरास शुभेच्छा दिल्या.
किनवट डाक निरीक्षक अभिनव सिन्हा व विपणन कार्यकारी अधिकारी मुख्य पोस्ट ऑफिस नांदेड यांनी वधू व वरास मोबाईल फोनद्वारे शुभेच्छा दिल्या.
हेही वाचा - वयोवृद्ध महिलेनी मृत्यूशी झुंज देत केली कोरोनावर मात
कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असल्याने सर्वच जण चिंतेच वातावरण
सध्या कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असल्याने सर्वच जण चिंतेच आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात देशाची आर्थीक परिस्थिती कशी असणार यावर चर्चा सुरु आहे. भविष्याचा विचार करुन प्रत्येक जण बचतीकडे वळला आहे. नको तो खर्च टाळत आहेत. अनेकांना लॉकडाउनमध्ये सर्व उद्योगधंदे बंद झाल्याने पदरमोड करावे लागत आहे.
सध्याच्या शासन निर्देशानुसार लग्न
जिल्ह्यात कोरोनाचे संकट वाढत असल्याने आपल्याही भविष्याचा विचार करून नवदाम्पत्यानेही लग्नावर होणारा खर्च टाळून व सध्याच्या शासन निर्देशानुसार लग्न केले. त्यांनी येणाऱ्या काळात बचत कशी करावी व ती कुठे करावी यासठी थेट लग्न मंडपाताच पोस्ट बँक खाते उघडल्यानंतरच हे नवदाम्पत्य लग्नाच्या बोहल्यावर चढले.