esakal | नांदेडला रविवारी २९ कोरोना पॉझिटिव्ह ; ३१ रुग्ण कोरोनामुक्त 
sakal

बोलून बातमी शोधा

file Photo

शनिवारी (ता. दोन) ९४८ स्वॅब प्राप्त झाले. त्यामधील ८९४ निगेटिव्ह तर २९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या २१ हजार ५६६ एवढी झाली आहे.

नांदेडला रविवारी २९ कोरोना पॉझिटिव्ह ; ३१ रुग्ण कोरोनामुक्त 

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड - जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्ण आणि रुग्णालयातून सुटी देण्यात आलेल्या रुग्णांच्या संख्येत रविवारी (ता.तीन) काहि प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले आहे. प्राप्त झालेल्या अहवालानुसार रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांपैकी ३१ रुग्ण बरे झाले आहेत. तर २९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 

शनिवारी (ता. दोन) ९४८ स्वॅब प्राप्त झाले. त्यामधील ८९४ निगेटिव्ह तर २९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या २१ हजार ५६६ एवढी झाली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयातील - १३, नांदेड वाघाळा महापालिकेंतर्गत गृह विलगिकरण कक्षातील - आठ, हदगाव - एक, मुखेड - एक, किनवट- एक, माहूर - एक आणि खासगी रुग्णालयातील तीन असे ३१ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

हेही वाचा- नांदेडमध्ये जबरी चोरीतील दोन आरोपींना मुद्देमालासह अटक, एका महिलेचा आहे समावेश ​

आठ बाधितांची प्रकृती अतीगंभीर

आतापर्यंत कोरोना आजारातुन २० हजार ४६६ बाधितरुग्ण औषधोपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या ३२४ बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरू असून त्यातील आठ बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. 

हेही वाचा- नांदेड जिल्हा बँकेच्या निवडणुकीला अखेर मुहुर्त, सोमवारपासून प्रक्रिया ​

३२४ बाधितांवर औषधोपचार सुरु

रविवारी (ता. तीन) दिवसभरात एकाही गंबीर रुग्णाचा मृत्यू झाला नाही. जिल्ह्यातील मृत्यू संख्या ५७५ वर स्थिर आहे. रविवारी नांदेड वाघाळा महापालिकेंतर्गत - १७, नांदेड ग्रामीण - एक, बिलोली - दोन, हदगाव - एक, मुखेड- तीन, नायगाव - एक, धर्माबाद - एक, यवतमाळ- दोन आणि हिंगोली - एक असे २९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात ३२४ बाधितांवर औषधोपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी माहिती दिली. 

नांदेड कोरोना मीटरः 

एकूण पॉझिटिव्ह - २१ हजार ५६६ 
एकूण बरे - २० हजार ४६६ 
एकूण मृत्यू - ५७५ 
रविवारी पॉझिटिव्ह - २९ 
रविवारी  बरे - ३१ 
रविवारी  मृत्यू - शुन्य
रविवारी  प्रलंबित स्वॅब - ३९५ 
उपचार सुरु -३२४ 
अतिगंभीर रुग्ण -आठ

loading image