esakal | धर्माबाद तालुक्यात ३१ हजार ब्रास गाळ उपसा
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हाधिकारी डाॅ. विपीन

धर्माबाद तालुक्यात ३१ हजार ब्रास गाळ उपसा

sakal_logo
By
सुरेश घाळे

धर्माबाद ( जिल्हा नांदेड ) : गाळमुक्त तलाव व गाळयुक्त शिवार मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील तलावातून गाळ काढून तलाव गाळमुक्त करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले आहेत. दरम्यान धर्माबाद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुढाकारातून आतापर्यंत धर्माबाद तालुक्यातील पाच तलावातून ३१ हजार ७४० ब्रास गाळ उपसा करण्यात आला. आता गाळमुक्त तलाव व गाळयुक्त शिवार मोहिमेअंतर्गत तालुक्यातील १३ तलावातून एक लाख १४ हजार ब्रास गाळ उपसा करण्याच्या कामास प्रारंभ झाला आहे. या कामाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी अतकूर येथील तलावात प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.

शेतीच्या विकासासाठी गाळयुक्त जमीन भुसभुशीत करणे आवश्यक आहे. यासाठी सरकारच्या विविध योजना सुरू आहेत आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक ती मदत व माहितीही सरकारतर्फे देण्यात येत आहे. गाळमुक्त तलाव व गाळयुक्त शिवार ही योजना शेतकऱ्यांच्या हिताची असून शेतजमिनीला नवी संजीवनी देणारी आहे. धर्माबाद तालुक्यातील तलावातील गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी केवळ तो गाळ स्व: खर्चाने आपल्या शेतात टाकायचा आहे. यामुळे शेतजमिनीचा पोत सुधारुन उत्पन्न वाढीस हातभार लागणार आहे. रासायनिक खताच्या अतिवापरामुळे अनेक ठिकाणच्या शेतीचा पोत खराब झाला असून गाळमुक्त तलाव व गाळयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून काढण्यात येणाऱ्या गाळामुळे शेतीचा स्तर सुधारण्यास निश्चितच मदत होणार आहे. व तलावाची साठवण क्षमता वाढेल.

हेही वाचा - मंगळवारी (ता. २५) सकाळी सातच्या सुमारास निगडी प्राधिकरण येथे ही घटना घडली.

दरम्यान धर्माबाद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुढाकारातून आतापर्यंत तालुक्यातील करखेली, चिकना, समराळा, धानोरा (खु), जापलापूर पाच तलावातून ३१ हजार ७४० ब्रास गाळ उपसा करण्यात आला. गाळमुक्त तलाव व गाळमुक्त शिवार मोहिमेअंतर्गत तलावातून गाळ काढून तलाव गाळमुक्त करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले असून धर्माबाद तालुक्यातील जारीकोट, अतकूर, सायखेड, करखेली, रत्नाळी, येवती, रामेश्वर, धानोरा (खुर्द), चिकना, येताळा, समराळा, बाळापूर, राजापूर या १३ तलावातून एक लाख १४ हजार ब्रास गाळ उपसा करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे तहसीलदार दत्तात्रय शिंदे यांनी सांगितले आहे.

या मोहिमेचा शुभारंभ अतकूर येथून झाला असून अतकूर तलावातून गाळ उपसा करण्याच्या कामाचा शुभारंभ तहसीलदार दत्तात्रय शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला आहे. यावेळी तलाठी सहदेव बासरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. तलावातील गाळ शेतात घेऊन जाण्यासाठी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image
go to top