अबब...! नांदेडमध्ये ३६० लीटर अवैध देशी दारु जप्त; दोघांना अटक- निलेश सांगडे

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक निलेश सांगडे हे नुकतेच कोरोना या संसर्गावर मात करत कर्तव्यावर हजर झाले. त्यांनी आपल्या क्वारंटाईन काळात सहकाऱ्यांच्या बळावर जिल्ह्यात विविध ठिकाणी अवैध दारु विक्रीवर कारवाया सुरुच ठेवल्या होत्या.
नांदेड राज्य उत्पादन शुल्ककडून कारवाई
नांदेड राज्य उत्पादन शुल्ककडून कारवाई
Updated on

नांदेड : राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्हाभरात (Nanded exise raid on illegal liquor)अवैध देशी, हातभट्टी विक्री करणाऱ्यांविरुद्ध धडक मोहीम राबविण्यात येत आहे. पथकांनी वेगवेगळ्या ठिकाणी कारवाया सुरु केल्या असून या कारवाईदरम्यान नांदेड शहरापासून पाच किलोमिटर अंतरावर असलेल्या काकांडी शिवारातून (kakandi area) तब्बल अवैध ३६० लीटर देशी दारुचा साठा जप्त केला. ही कारवाई निरीक्षक एस. एम. बोदमवाड यांच्या पथकाने मंगळवारी (ता. १८) सायंकाळच्या सुमारास केली. यावेळी पथकाने दोघांना अटक करुन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून एक लाख ६९ हजार ८० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. करुन लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. (360 liters of illegal liquor seized in Nanded; Both arrested- Nilesh Sangde)

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक निलेश सांगडे हे नुकतेच कोरोना या संसर्गावर मात करत कर्तव्यावर हजर झाले. त्यांनी आपल्या क्वारंटाईन काळात सहकाऱ्यांच्या बळावर जिल्ह्यात विविध ठिकाणी अवैध दारु विक्रीवर कारवाया सुरुच ठेवल्या होत्या. मात्र प्रमुखच जर हजर नसेल तर काही कर्मचारी आणि अधिकारीसुद्धा अंगचोरपणा करतात. परंतु निलेश सांगडे यांची टीम ही सतत कार्यरत असते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरात विविध ठिकाणी कारवाया पुन्हा सुरु करण्यात आल्या. यावेळी पथकांनी अवैध देशी, हातभट्टी, रसायन, वाहने यांच्यावर करडी नजर ठेवली आहे.

हेही वाचा - उमरीचा सहाय्यक फौजदार एसीबीच्या जाळ्यात; पेट्रोलचा खर्च मागणे पडले महागात

मंगळवारी (ता. १८) सायंकाळच्या सुमारास श्री. सांगडे यांना मिळालेल्या माहितीवरुन त्यांनी आपले सहकारी अधिकारी निरीक्षक एस. एम. बोदमवाड, दुय्यम निरीक्षक बी. व्ही. हिप्परगेकर, सहाय्यक दुय्यम निरीक्षक के. के. किरतवाड, जवान ए. ए. पटेल, एस. ए. नंदगावे, आर. बी. फाळके, जी. व्ही. भालेराव, डी. के. जाधव आणि श्रीमती डी. एस. टेंभूर्णे यांना काकांडी परिसरात कारवाईसाठी पाठविले. या पथकाने सतर्कता पाळत काकांडी शिवारात एका ठिकाणी छापा टाकला. यावेळी हरपीतसिंग ढिल्लो आणि शिवाजी बागल या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ३६० लीटर देशी दारु जप्त केली. तसेच एक दुचाकीही जप्त करुन या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या कारवाईमुळे पुन्हा अवैध दारु विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. पथकाचे जिल्हाधिकारी डाॅ. विपीन, अधीक्षक निलेश सांगडे यांनी कौतुक केले.

यापुढेही कारवाया सुरुच राहतील

जिल्ह्यात कुठेही अवैध मद्याची निर्मिती, विक्री व वाहतूक होऊ नये याकरीता राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत विशेष भरारी पथकांची स्थापना करण्यात आली. सदर पथक दिवसरात्र त्यांना नेमून दिलेले कामकाज करीत आहेत. संशयित वाहनांची तपासणी करणे, सराईत गुन्हेगारांवर नजर ठेवणे, तसेच अवैध मद्याबाबत कारवाया करण्याचे काम या पथकांनी केलेले आहे. तसेच जिल्ह्यामध्ये बिलोली व देगलूर या सिमावर्ती भागात विशेषतपासणी करण्यात येत आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की अवैध देशी व अन्य मद्य विक्रीसाठी किंवा साठा करुन कोणी ठेवलेले असेल तर त्यांची गोपनीय माहिती आम्हाला द्यावी, माहिती देणाऱ्यांचे नाव गोपनिय ठेवून संबंधीतावर कारवाई करण्यात येईल असे आवाहन करण्यात आले.

- निलेश सांगडे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, नांदेड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com