नांदेडला हरभरा उत्पादकांचे ४० कोटींचे चुकारे थकले...

अभय कुळकजाईकर
Tuesday, 15 September 2020

नांदेड जिल्ह्यात १६ खरेदी केंद्रावर हमी दरानुसार तूर, हरभरा धान्य खरेदी करण्यात आले. हरभरा खरेदीतील दहा हजार ४९१ शेतकऱ्यांच्या एक लाख ७८ हजार २९५ क्विंटल हरभऱ्याचे ८६ कोटी ९१ लाख ९२ हजार रुपये देण्यात आले. परंतु अद्याप चार हजार ६३४ शेतकऱ्यांचे ८३ हजार ९७८ क्विंटल हरभऱ्याचे ४० कोटी ९३ लाख ७२ हजार रुपये थकले आहेत. त्यामुळे हे थकलेले चुकारे त्वरीत द्यावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

नांदेड - जिल्ह्यात ‘नाफेड’कडून केंद्र शासनाच्या किमान हमी दरानुसार तूर व हरभरा धान्य खरेदी करण्यात आले. यात आठ हजार सहाशे शेतकऱ्यांची ४३ हजार ३४२ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली तर पंधरा हजार १२५ शेतकऱ्यांचा दोन लाख ६२ हजार २७३ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. हरभरा खरेदीतील दहा हजार ४९१ शेतकऱ्यांचे एक लाख ७८ हजार २९५ क्विंटल हरभऱ्याचे ८६ कोटी ९१ लाख ९२ हजार रुपये देण्यात आले. परंतु अद्याप चार हजार ६३४ शेतकऱ्यांचे ८३ हजार ९७८ क्विंटल हरभऱ्याचे ४० कोटी ९३ लाख ७२ हजार रुपये थकले आहेत.

जिल्ह्यात १६ खरेदी केंद्रावर किमान हमी दरानुसार हरभरा व तूर खरेदी करण्यात आला. दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनकडून नांदेड, मुखेड, किनवट, हदगाव, बिलोली व देगलूर तर विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनकडून नायगाव, भोकर व धर्माबाद येथून तसेच महाराष्ट्र फार्मर्स प्रोड्युसर कंपनीकडून (महाएफपीसी) धानोरा, (ता. धर्माबाद), करडखेड (ता. देगलूर), बरबडा (ता. नायगाव, डोणगाव (ता. बिलोली), नारनाळी (ता. कंधार), मांडवा (ता. किनवट) व धानोरा मक्ता (ता. लोहा) या ठिकाणी खरेदी करण्यात आली. 

हेही वाचा - गाव तसे चांगले, पण समस्यांनी गांजले, कुठे ते वाचा
 

हरभरासोबत तूरीचेही पैसे थकले
संपूर्ण हंगामात १५ हजार १२५ शेतकऱ्यांचा दोन लाख ६२ हजार २७३ क्विंटल हरभरा चार हजार ८७५ हमी दराने खरेदी करण्यात आला. आजपर्यंत दहा हजार ४९१ शेतकऱ्यांच्या एक लाख ७८ हजार २९५ क्विंटल हरभऱ्याचे ८६ कोटी ९१ लाख ९२ हजार रुपये देण्यात आले. परंतु अद्याप चार हजार ६३४ शेतकऱ्यांच्या ८३ हजार ९७८ क्विंटल हरभऱ्याचे ४० कोटी ९३ लाख ७२ हजार रुपये थकले आहेत. या सोबतच जिल्ह्यातील पंधरा ठिकाणच्या केंद्रावर आठ हजार सहाशे शेतकऱ्यांची ४३ हजार ३४२ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. या पैकी आठ हजार तीनशे ३७४ शेतकऱ्यांच्या ४२ हजार ६३९ क्विंटल तुरीचे पाच हजार आठशे रुपये दराने २४ कोटी ७३ लाख ६५ हजार ८८२ रुपये देण्यात आले. यापैकी ६९३ क्विंटलचे चाळीस लाख १९ रुपये देणे शिल्लक असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) कार्यालयाकडून मिळाली.

हेही वाचलेच पाहिजे - सावधान : इसापूर धरणाचे पाच दरवाजे उघडले, 240.27 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग

शेतकऱ्यांकडे द्यावे लक्ष
जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाला. त्यामुळे पेरण्याही वेळेवर झाला. मात्र, या दोन महिन्यात पुन्हा पाऊस झाल्याने हाताला आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या पुन्हा वाढल्या आहेत. आता तूर, हरभरा धान्य खरेदी करुनही अद्याप साडेचार हजाराच्यावर शेतकऱ्यांना त्याचे चुकारे मिळाले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या, अडचणींकडे लक्ष देऊन त्या सोडविण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 40 crore errors of gram growers in Nanded ..., Nanded news