
अर्धापूर (नांदेड) : तालुक्यातील 43 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत बिनविरोध निवडून येण्यात महिलांनी बाजी मारली आहे. तालुक्यातील 67 बिनविरोध उमेदवारांपैकी तब्बल 45 महिला उमेदवार बिनविरोध निवडून आल्या आहेत. तर आमराबाद, आमराबाद तांडा, खैरगाव आदी गावात महिला सदस्यांची संख्या जास्त असल्यामुळे या ग्रामपंचायतीमध्ये महिलांचा बोलबाला राहणार आहे. भविष्यातील सरपंचपदाला आरक्षणाचा फटका बसू नये, यासाठी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जास्तीत जास्त महिलांना उमेदवारी देण्याचा कल पॅनलप्रमुखांचा आहे. त्यामुळे ६० टक्के महिला ग्रामपंचायत सदस्य राहण्याची शक्यता आहे. तालुक्यातील या 37 ग्रामपंचायतच्या 111 वार्डातील 299 जागांसाठी 754 उमेदवार निवडणूक लढवित आहेत.
तालुक्यातील 43 ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरू असून काही गावात दुरंगी, तिरंगी लढती होत आहेत. 43 ग्रामपंचायतीच्या 141 वार्डातील 377 सदस्यांच्या लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. तालुक्यात 67 सदस्य 22 वार्ड बिनविरोध झाले आहेत. यात सुमारे 45 महिला बिनविरोध निवडून आल्या असून आमराबाद तांडा या ग्रामपंचायतीमध्ये सर्व महिला बिनविरोध निवडून आल्या आहेत. तर आमरबाद ग्रामपंचायत निवडणुकीची बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम राहिली आहे.
तालुक्यातील आमराबाद ,आमरबाद तांडा, खौरगाव(म), सोनाळा, देळूब खुर्द, शैलगाव खुर्द या सहा ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. ग्रामपंचायत निहाय बिनविरोध निवडून आलेले उमेदवार पुढील प्रमाणे आहेत. सोनाळा रेणुका मारकळ, स्वाती हाॅकर्ण, बालाजी करडे, रघुनाथ खोकले, ब्रम्हानंदाबाई देबगुंडे, ललिता धुमनर, सविता धुमनर, जांभरूण शालिनी जिंके, सिंधू सिदेवार, मन्मथ पातेवार, घनश्याम तिलेवारी, मंदाकिनी गव्हाणे, शाहपूर द्वारका कदम, विलास सोळंके, बालाजी विभुते, रेखाबाई पंडागळे, शकुंतला पिंपळपल्ले, आमराबाद तांडा, शिल्पा राढोड, लताबाई पवार, अश्विन पवार, शशीकला पवार, आमराबाद सरस्वतीबाई मुकदम, सिंधूबाई टेकाळे, पार्वतीबाई टेकाळे, श्यामराव टेकाळे, सांगवी श्रावण सोनटक्के, शांताबाई बोराटे, भोगाव राजाबाई गाडे, शंकर गाडे, कमल सुर्यवंशी, शेख फरजाना, संगिता कराळे, उमरी वैजंतीमाला बारसे गंगाबाई भिसे, लोणी खुर्द सुभद्रा लोणे,सविता जाधव, तुलाबाई शिंदे, अनुसयाबाई लोणे, धामदरी कमल मस्के, पांडुरंग मस्के, शैलगाव खुर्द, महानंदा राजेगोरे, विश्रांती राजेगोरे, धिरज घोडे, निर्मलाबाई गायकवाड, माधव राजेगोरे, दिग्रस नांदला गिरजा पांचाळ, सुनिता क्षिरसागर, दाभड आरविं पांचाळ, पार्डी अनिता शिखरे, सत्यभामा हपगुंडे, पिंपळगाव प्रभावती कल्याणकर, देळूब खुर्द जिजाबाई डाखोरे, छाया पताळे, मोतीराम डाखोरे, रंजना कदम, साहेब थोरात, खैरगाव (म) लक्ष्मीबाई थोरात, मिनाक्षी लांडगे, व्यंकटी पवार, तुळशीराम श्रावणे, विद्या लांडगे, छाया लांडे, सारिका चव्हाण, निमगाव अश्विनी मोळके, खैरगाव संजय गोवंदे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.