
नांदेड : शनिवारी (ता.२१) आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्यावर केळी संशोधन केंद्र नांदेड येथे सुरक्षित जागेत ५०१ पर्यावरणपूरक कडुनिंबांसह अन्य वृक्षांची लागवड जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते करण्यात आली. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, वृक्ष मित्र फाउंडेशन, गुरुद्वारा लंगर साहेब व इतर सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हरित अभियान २०२५ राबविले जात आहे. याअंतर्गत यावर्षी शहरात २६ हजार वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केला आहे.