esakal | कुंडलवाडी भाजपचा एक गट काँग्रेसच्या दावणीला; माजी नगराध्यक्ष महाआघाडीच्या स्टेजवर
sakal

बोलून बातमी शोधा

भाजपचे माजी नगराध्यक्ष भाषण करताना

कुंडलवाडी भाजपचा एक गट काँग्रेसच्या दावणीला; माजी नगराध्यक्ष महाआघाडीच्या स्टेजवर

sakal_logo
By
अमरनाथ कांबळे

कुंडलवाडी (जिल्हा नांदेड) : येथील के रामलू मंगल कार्यालय येथे आगामी होणाऱ्या देगलूर- बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला भाजपचे माजी नगराध्यक्ष यांनी अधिकृतरित्या पक्ष प्रवेश न करता थेट काँग्रेसच्या स्टेजवर विराजमान होऊन मनोगत व्यक्त केल्यामुळे शहरात महाविकास आघाडीच्या नावाखाली काँग्रेस, शिवसेना, भाजपचा एक गट एकत्र आल्याचे चित्र पहावयास मिळाले आहे.

कुंडलवाडी नगरपालिकेवर गेल्या दहा महिन्यांपूर्वी भाजपची एकहाती सत्ता प्रस्थापित होती. त्यात भाजपचे तत्कालीन नगराध्यक्षा डॉ. अरुणा कुडमुलवार यांचे जात वैधता प्रमाणपत्र मुदतीच्या आत दाखल न केल्यामुळे त्यांना अपात्र ठरविण्यात आले होते. या रिक्त झालेल्या जागेवर नगरसेवकांतून नगराध्यक्ष पदाची निवडणूक घेण्यात आली होती. या निवडणुकीत पडद्यामाघून भाजपचे माजी नगराध्यक्ष यांनी तत्कालीन उपाध्यक्ष यांच्या एकाधिकारशाहीच्या नावाखाली नाट्यमय खेळी करत स्व: पक्षाचे सहा नगरसेवक फोडून तत्कालीन भाजप उपाध्यक्ष यांना एकाकी पाडत सत्तेपासून दूर ठेऊन महाविकास आघाडीच्या नावाखाली काँग्रेस, शिवसेना, बंडखोर भाजप अशी युती करुन शिवसेनेच्या सुरेखा जिठ्ठावार यांना नगराध्यक्षपदी विराजमान केले होते.

हेही वाचा - राजस्थानातील सात ठिकाणी एन्जॉय करा हनीमूनची पहिली सुटी

भाजपच्या एका गटाने स्व: पक्षाची सत्ता घालून दुसऱ्या पक्षाची सत्ता प्रस्थापित करण्यातच त्यावेळी धन्यता मानली आहे. असे असले तरी ता. 13 जून रोजी के रामलू मंगल कार्यालय येथे देगलूर- बिलोली विधानसभा पोटनिवडणूकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली.

येथे क्लिक करा - हिंगोली जिल्ह्यात हळद लागवडीला सुरुवात; क्षेत्र वाढले

या बैठकीला उघडपणे भाजपचे माजी नगराध्यक्ष यांनी अधिकृतरीत्या पक्ष प्रवेश न करता थेट काँग्रेसच्या स्टेजवर विराजमान होऊन मनोगत व्यक्त केल्यामुळे शहरात काँग्रेस, शिवसेना व भाजपचा एक गट एकत्र असल्याचे दिसून आले. तसेच भाजपचे बंडखोर नगरसेवक आजही खासगीमध्ये आम्ही भाजपचे नगरसेवक आहोत असे बोलत आहेत. असे असले तरी राज्यात काँग्रेस आणि भाजप हे प्रमुख विरोधी पक्ष म्हणून ओळखले जातात. मात्र शहरात काँग्रेसच्या दावणीला भाजपचा एक गट बांधला गेल्यामुळे आगामी होणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुकीत कोणाला फायदा होईल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image