मोक्कातील आरोपीस अटक, पावणेदोन लाखाचे दागिने जप्त- द्वारकादास चिखलीकर

प्रल्हाद कांबळे
Wednesday, 29 July 2020

मोक्कातील फरार अट्टल आरोपीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानी मुसक्या आवळल्या. त्याला सिडको परिसरातून अटक करुन त्याच्याकडून पावणेदोन लाखाचे सोन्याचे दागिणे जप्त केले.

नांदेड : जिल्ह्यात व शेजारील लातूर जिल्ह्यात घरफोडी व आदी गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल असुन मोक्कातील फरार अट्टल आरोपीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानी मुसक्या आवळल्या. त्याला सिडको परिसरातून मंगळवारी (ता. २८) सायंकाळी अटक करुन त्याच्याकडून पावणेदोन लाखाचे सोन्याचे दागिणे जप्त केले. त्याने व त्याच्या इतर साथिदारांनी विविध ठिकाणी २३ घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. 

जिल्ह्यात घरफोडीसारखे तब्बल २३ हून अधिक गुन्हे दाखल असलेल्या मोक्कातील फरार आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार प्रविण राठोड यांच्या पथकाने अटक केली. अटक केलेल्या आरोपीकडून एक लाख ७२ हजार रुपयांच्या सोन्याचे दागिने (ज्यात गंठण, चैन) जप्त केले. या चोरट्याने उस्माननगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत लाॅकडाउनच्या काळात विविध गावात घरफोडी केल्याची कबुली दिल्यानंतर त्याला उस्माननगर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

हेही वाचा नांदेडला मोठा हादरा : मंगळवारी पहिल्यांदाच १३४ रुग्णांची भर, १० मृत्यू, संख्या पोहचली १५२८ वर

फरार आरोपी आनंदा देवराव भोसले याला अटक केले 

पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांना जिल्ह्यातील घरफोडी तसेच पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी सूचना देण्यात आल्या. श्री चिखलीकर यांनी आपले सहकारी पोलीस उपनिरीक्षक प्रविण राठोड यांचे पथक शहरात गस्तसाठी रवाना केले. हे पथक शहरात मंगळवारी (ता. २८) सायंकाळच्या सुमारास गस्त घालत असताना त्यांना एका अट्टल गुन्हेगाराबद्दल माहिती मिळाली. तो मागील काही दिवसांपासून मोक्का अशा गंभीर प्रकरणातून फरार होता. तसेच त्याच्यावर अनेक घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. मिळालेल्या माहितीवरुन पथकानी सि़डको परिसरात सापळा लावला. त्यानंतर सिडकोच्या शिवाजी चौकातून फरार आरोपी आनंदा देवराव भोसले याला ताब्यात घेतले.

येथे क्लिक कराजगातील सर्वात मोठ्या निमलष्करी दलाचा वर्धापन दिन साजरा...कुठे झाला ते वाचा....

नांदेड आणि लातूर जिल्ह्यात घरफोडीसह विविध गंभीर गुन्हे

त्याच्यावर नांदेड आणि लातूर जिल्ह्यात घरफोडीसह विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक लाख ७२ हजार रुपयांचे दागिने मिळाले. तसेच इतर पाच साथीदारांच्या मदतीने घरफोडी केल्याची कबुली त्याने दिली आहे. पोलिसांनी आरोपीला उस्माननगर पोलिसांच्या ताब्यात दिले असून लॅाकडाऊनच्या काळात चोऱ्यांचे सत्र सुरूच होते. त्याला उस्माननगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शइवप्रकाश मुळे यांनी कंधार न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलिस कोठडीत पाठविले आहे. या पथकात पोलीस उपनिरीक्षक प्रवीण राठोड, हवालदार पिराजी गायकवाड, अफजल पठाण, देविदास चव्हाण, रविकिरण बाबर आणि विलास कदम यांनी परिश्रम घेतले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accused arrested in Mocca, two lakh jewelery seized Dwarkadas Chikhlikar nanded news