esakal | एलसीबीची कारवाई, उस्माननगर पोलिसांच्या जिव्हारी
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

झन्ना - मन्ना जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने कारवाई करून ११ जुगाऱ्यांना अटक केली. त्यांच्याकडून सव्वादोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

एलसीबीची कारवाई, उस्माननगर पोलिसांच्या जिव्हारी

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : कंधार तालुक्यातील उस्माननगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका शेतामध्ये सुरू असलेल्या झन्ना - मन्ना जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने कारवाई करून ११ जुगाऱ्यांना अटक केली. त्यांच्याकडून सव्वादोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कारवाई शनिवारी (ता. २०) सायंकाळी करण्यात आली. ही कारवाई उस्माननगर पोलिसांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. 

जिल्ह्यातील फरार व माली गुन्ह्यातील पाहिजे आरोपींना अटक करण्याच्या सुचना पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांना दिली. यावरून वरिष्ठांच्या सुचनांची अंमलबजावणी करण्यासाठी श्री. द्वारकादास चिखलीकर यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक रमाकांत पांचाळ यांना कंधार तालुक्यात गस्त घाण्यासाठी रवाना केले. हे पथक उस्माननगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना त्यांना मिळालेल्या माहितीवरुन कारावई कारवाई केली. 

हेही वाचा -  नांदेडमध्ये लाॅकडाउन काळात दिव्यांगांची थट्टा - कोण म्हणतंय? वाचा

अटक केलेले हे आहेत आरोपी

पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की उस्माननगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या माधव वडवळे यांच्या शेतातील जुगार अड्ड्यावर कारवाई केली. यावेळी पोलिसांनी ११ जणांना अटक केले. अटक केलेल्यामध्ये शंकर बालाजी शिंदे रा. डोलारा, तालुका लोहा, देवराव लव्हेकर रा. पाटोदा, तालुका नायगाव, बालाजी चंदन पवार बाभूळगाव, भास्कर दुलाजी शिंदे रा. दहिकळंबा, मारोती भाऊराव शिंदे रा. जोशी सांगवी, अनिल माधवराव खंडाळे रा. जोशी सांगवी, रामकिशन गोविंदराव मोरे जोशी सांगवी गंगाधर विठ्ठलराव डोईजड गोपाळचावडी, शिवाजी यशवंतराव मोरे, सचिन मारुती घोरबांड बोरगाव, माधव व्‍यंकटी वडवळे रा. कापसी बुद्रुक यांचा समावेश आहे.

उस्माननगर पोलिस ठाण्यात गुन्हा

याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक श्री पांचाळ यांनी उस्माननगर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून वरील ११ आरोपीविरुद्ध मुंबई जुगार कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या जुगाऱ्यांकडून सव्वादोन लाखांचा ऐवज जप्त केला असून तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेबूब बेग करत आहे.

येथे क्लिक करा -  कोरोना : महावितरण कर्मचाऱ्यांच्या वारसांना ३० लाख रूपयांचे सानुग्रह अनुदान

अवैध धंद्याचे माहेरघर

उस्मानगर (ता. कंधार) पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे जोमात सुरू आहेत. सर्वाधीक या परिसरातून वाळू वाहतुक केल्या जाते. मात्र स्थानिक पोलिस राजकिय दबावापोटी किंवा आपल्या आर्थीक हितासाठी या धंद्यावर नियंत्रण मिळवू शकले नाही. दाखल झालेल्या एकाही गुन्ह्याचा शोध उस्मानगर पोलिसांना लावता आला नाही. अनेक गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ करण्यात येते. अनेक तक्रारकर्ते पोलिस अधीक्षक कार्यालयात न्यायासाठी खेटे मारतात. मात्र त्यांना न्याय मिळत नाही. ही शोकांतका असून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यानी या बाबीकडे लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.