esakal | नांदेडमध्ये लाॅकडाउन काळात दिव्यांगांची थट्टा - कोण म्हणतंय? वाचा  
sakal

बोलून बातमी शोधा

fail photo

शहर महापालिका प्रशासनाने दिव्यांगांना लॉकडाउन कालावधीत एक हजार रुपये तुटपुंजी मदतीचे वाटप सुरू केले आहे. महागाईच्या तुलनेत किराणा, भाजी-पाला खरेदीसाठी महिन्याकाठी किमान पाच हजार रुपये लागतात. त्यापुढे एक हजार रुपयाची तुटपुंजी मदत देऊन महापालिका प्रशासनाने दिव्यांगची थट्टा केल्या आरोप दिव्यांग कल्याण कृती समिती संघटनेचे राहुल साळवे यांनी केला आहे. 

नांदेडमध्ये लाॅकडाउन काळात दिव्यांगांची थट्टा - कोण म्हणतंय? वाचा  

sakal_logo
By
नवनाथ येवले

नांदेड ः कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी लॉकडाउन कालावधीत शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार शहरासह जिल्हाभरात खबरदारीच्या उपाय योजना राबवण्यात येत आहेत. कोरोना महामारीचा सर्वच क्षेत्रावर विपरीत परिनाम झाल्यामुळे उद्योग, व्यवसायाची चाके रुतली आहेत. रोजगाराअभावी शेतकरी, शेतमजुर, कामगार, व्यवसायीकांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. 

वाहतूक साधनांची चाके रुतल्यामुळे हातावर पोट असलेल्या व्यवसायीकांवर उपासमारीची वेळ आली आहे. शहर परिसरात जगण्यासाठी धडपडणाऱ्या दिव्यांगाना आर्थीक मदतीची मागणी बेरोजगार दिव्यांग कल्याणकृत्ती संघर्ष समीतीतर्फे करण्यात आली होती. बेरोजगार दिव्यांगांची भुक भागवण्यासाठी महापालीका प्रशासनाकडून फिरत्या पथकाद्वारे भोजन वाटप करण्यात आले. मात्र, शहरातील मोजक्या दिव्यांगांनाच याचा लाभ मिळाला. त्यामुळे संघटनेच्या मागणीनुसार महापालिका प्रशासनाने आर्थीक मदतीची तरतुद केली. 

एक हजारच लाभार्थी पात्र
दिव्यांगाची उपासमार रोखण्यासाठी त्यांच्या बॅंकखात्यावर भरीव मदतीच्या संघटनेच्या मागणीनुसार महापालिका प्रशासनाने शहर परिसरातील दिव्यांग लाभार्थींकडून जून (ता.१२) शुक्रवार पर्यंत अर्ज मागवले. लॉकडाउनमुळे खबरदारीसाठी उपयुक्त साधनांअभावी अनेक दिव्यांगांना अर्ज करता आले नाही. महापालिका प्रशासनाने अर्जासाठी कालमर्यादा ठरवल्यामुळे शहर परिसरातून केवळ एक हजार ३५९ दिव्यांग लाभार्थींनी अर्ज केले. अर्जाचा कालाधी वाढवून दिला असता तर शेकडो दिव्यांगांनी अर्ज केले असते. प्राप्त आर्जात लाभासाठी निकष लावत महापालिका प्रशासनाने एक हजार लाभार्थी पात्र ठरवले. 

हेही वाचा -कोण म्हणतंय समाजातली माणूसकी आटलीय !

दिव्यांगांची थट्टाच
शहरातील महापालिकेच्या सहाही क्षेत्रातून मागवलेल्या अर्जानुसार लाभार्थींच्या खात्यावर किमान पाच हजार रुपये आर्थीक मदतीच्या मागणीला महापालिका प्रशासनाकडून बगल देण्यात आली. दरम्यान, महागाईच्या तुलनेत बेरोजगार दिव्यांग लाभार्थींना महापालिका प्रशासनाने केवळ एक हजार रुपये तुटपुंजी मदतीचे वाटप सुरू केले. मागणीच्या तुलनेत मिळणाऱ्या तुटपुंज्या मदतीतून भाजी-पालाही खरेदी कठीण आहे. महिनाभरासाठी एका व्यक्तीस लागणाऱ्या धान्यासह किराणा साहित्यासाठी किमान पाच हजार रुपये मदतीची गरज असताना महापालिका प्रशासनाने तुटपुंजी एक हजार रुपयांच्या मदतीने दिव्यांगाची थट्टा केली आहे. 

येथे क्लिक करा -  असं जगता आले तर बरं होईल, कसे? ते वाचाच

आर्थिक मदतीच्या माहितीनुसार  जून (ता.२१) रविवारी महापालिका आयुक्त लहुराज माळी यांच्याशी भ्रमणध्वणीवरुन संवाद साधला असता ते म्हणाले की, प्राप्त अर्जानुसार दिव्यांग लाभार्थींना प्रति महिना एक हजार रुपयांची आर्थीक मदत देण्यात येणार आहे. मात्र, किती महिने देणार याची वाच्यता त्यांनी केली नाही. याशिवाय लाभापासून वंचित दिव्यांगाकडून अर्ज मागवण्यावर त्यांनी प्रतिउत्तर दिले नाही. सरसकट दिव्यांगाना पाच हजार रुपये आर्थीक मदतीसाठी आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेचे राहुल साळवे दिला आहे. 
 

loading image