esakal | नांदेड जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षकांची कारवाई; जाळले अवैध वाळू उपसा करणारे तराफे
sakal

बोलून बातमी शोधा

वाळू उपसा करणारे गोदावरी पात्रातील तराफे जाळले

नांदेड जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षकांची कारवाई; जाळले अवैध वाळू उपसा करणारे तराफे

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : मागील महिण्यात गंगाबेट व मार्कंड घाटावर जिल्हाधिकारी यांनी धाडशी कारवाई करुन लाखोंचा मुद्देमाल जप्त केला होता. त्यानंतर काही अशी वाळू माफिया शांत झाले होते. परंतु पुन्हा त्यांनी डोके वर काढताच सोमवारी (ता. २१) स्वत: जिल्हाधिकारी यांनी पोलिस अधीक्षक व पोलिस फौजफाटा सोबत घेऊन गोदावरी नदीपात्रातून वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई केली. जिल्हाधिकाऱ्यांचे रौद्र रुप पाहताच वाळू माफियांनी आपले साहित्य तिथेट चाकून मिळेल त्या रस्त्याने धूम ठोकली. पोलिस व महसुलच्या पथकांनी तराफे जाळून नष्ट केले.

सोमवारी (ता. २१) जिल्हाधिकारी डॉ. विपीन, पोलिस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्या समक्ष शहरातील गोदावरी नदी पात्रालगत गोवर्धनघाट परिसरात अवैध रेती उपसा करणारे अनेक तराफे आणि बोटी जाळण्यात आल्या.

हेही वाचा - ओबीसी आरक्षणासाठी परभणीत जोरदार रास्तारोको

सकाळी बारा वाजेच्यासुमारास अचानकपणे जिल्हाधिकारी डॉ. विपीन, पोलिस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, पोलिस उपअधिक्षक ( शहर उपविभाग ) चंद्रसेन देशमुख, उपजिल्हाधिकारी लतिफ पठाण, तहसीलदार किरण अंबेकर, वजिराबादचे पोलिस निरिक्षक जगदीश भंडरवार यांच्यासह आदीसह पोलिस कर्मचारी, आरसीपीचे पथक, नायब तहसीलदार मुगाजी काकडे, मंडळाधिकारी जोंधळे, अनिल धुळगंडे, तलाठी श्री. गाडे आदी गोवर्धन घाट परिसरात पोहचले.

नदीतून या अधिकाऱ्यांसमक्ष अवैध वाळू काढण्याचे काम सुरु होते. अधिकाऱ्यांचा एवढा मोठा ताफा पाहताच अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांची पाचावर धारण बसली. कांही तराफे या अधिकाऱ्यांसमक्ष जाळ्यात आले आणि इतर तराफ्यांना नदी बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरु होती.

loading image