Nanded News : नांदेड वाघाळा महापालिकेचा कारवाईचा बडगा; २६७ अनधिकृत होर्डिंग्ज काढले

अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करण्याच्या सुचना आयुक्तांनी बैठकीत दिल्या.
Nanded News
Nanded Newssakal
Updated on

नांदेड : दिवसेंदिवस शहरातील मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यावरही अनधिकृतपणे आणि विनापरवानगी लावण्यात आलेले होर्डिंग्ज अखेर गुरूवारी (ता. पाच) सकाळपासून काढण्यास सुरूवात झाली.

नांदेड वाघाळा महापालिकेने कारवाईचा बडगा उगारात दिवसभरात सहा क्षेत्रीय कार्यालयातंर्गत पथकांनी तब्बल २६७ विनापरवाना होर्डिंग्ज काढून टाकले. त्यामुळे पहिल्यांदाच शहरातील मुख्य रस्त्यांवरील चौक बुधवारी होर्डिंग्जविना असलेले दिसून आले. विशेष म्हणजे या कार्यवाहीचे नांदेडकरांनी मनापासून स्वागत केले आहे.

महापालिका हद्दीत विनापरवानगी जाहिरात फलक लावले जात आहेत, त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत असून रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. रस्त्याने पायी चालणाऱ्यास अडथळा निर्माण होत आहे.

Nanded News
Nanded Crime : लग्नाच्या वरातीत गेल्यामुळं दलित तरुणाची निर्घृण हत्या; नवरदेवासह सात जणांना पोलीस कोठडी

विनापरवानगी लावण्यात येणा-या जाहिरातीबाबत मुंबई उच्च न्यायालयातील जनहित याचिकेमधील आदेशानुसार शहरात विनापरवानगी जाहिरात फलक, होर्डिंग्ज लावण्यात येवू नयेत तसेच असे होर्डिंग्ज लावल्यास नियमानुसार कारवाई करण्यात यावी, असे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत.

त्या अनुषंगाने महापालिकेचे आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी सर्व क्षेत्रीय अधिकारी मालमत्ता व्यवस्थापक व इतर विभागाच्या अधिका-यांची आढावा बैठक घेतली. शहरातील मालमत्तेचे विद्रुपीकरण होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या तसेच विनापरवानगी अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करण्याच्या सुचना आयुक्तांनी बैठकीत दिल्या.

Nanded News
Nanded Rain Update : पावसाच्या आगमनामुळे काहीसा दिलासा; शेत शिवारात साचले पाणी

त्यानुसार बुधवारी सहा क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत कारवाई करण्यात आली. त्यात क्षेत्रीय कार्यालय क्रमांक एक तरोडा - सांगवी अंतर्गत ६९ अनाधिकृत फलक, क्षेत्रीय कार्यालय दोन अशोकनगर अंतर्गत १३६, क्षेत्रीय कार्यालय तीन गणेशनगर अंतर्गत १४ फलक, क्षेत्रीय कार्यालय चार वजीराबाद अंतर्गत २१,

क्षेत्रीय कार्यालय पाच इतवारा अंतर्गत ११ आणि क्षेत्रीय कार्यालय सहा सिडको अंतर्गत १६ अनधिकृत फलक असे एकुण २६७ लहान, मोठे फलक काढण्यात आले. या कार्यवाहीत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, मालमत्ता व्यवस्थापक अजितपालसिंघ संधू यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रीय अधिकारी व क्षेत्रीय कार्यालयातील पथकाने सहभाग नोंदवला.

शहरातील व्यावसायिकांनी शहरात कुठेही विनापरवाना अनधिकृत होर्डिंग्ज लाऊ नयेत. अन्यथा मुंबई उच्च न्यायालयाच्या जनहित याचिकेच्या आदेशानुसार महापालिकेच्या वतीने मालमत्तेचा विरुपणास प्रतिबंध करण्यासाठी अधिनियम १९९५ अन्वये गुन्हे दाखल करण्यात येतील. विनापरवाना अनधिकृत होर्डिंग्जबाबतची मोहिम यापुढे अधिक तीव्रतेने राबविण्यात येणार आहे.

- अजितपालसिंघ संधू, मालमत्ता व्यवस्थापक.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.