esakal | प्रलंबित वीज जोडण्या देण्यासाठी दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाई- डाॅ. नरेश गिते
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

पायाभुत सुविधा उपलब्ध असतानाही प्रलंबित वीज जोडण्यासाठी विलंब केल्यास  शाखा अभियंता, सहायक अभियंता, उपकार्यकारी अभियंता व कार्यकारी अभियंता यांच्याची जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश महावितरण औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. नरेश गिते यांनी दिले.

प्रलंबित वीज जोडण्या देण्यासाठी दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाई- डाॅ. नरेश गिते

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : महावितरण औरंगाबाद प्रादेशिक कार्यालय अंतर्गत औरंगाबाद, लातूर व नांदेड परिमंडलातील घरगुती, व्यापारी आणि औघोगिक प्रलंबित  वीज जोडण्या आठ दिवसात घा. पायाभुत सुविधा उपलब्ध असतानाही प्रलंबित वीज जोडण्यासाठी विलंब केल्यास शाखा अभियंता, सहायक अभियंता, उपकार्यकारी अभियंता व कार्यकारी अभियंता यांच्याची जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश महावितरण औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. नरेश गिते यांनी दिले.
   
महावितरण औरंगाबाद प्रादेशिक कार्यालया अंतर्गत औरंगाबाद, लातूर व नांदेड परिमंडलातील घरगुती, व्यापारी आणि औघोगिक प्रलंबित वीज जोडण्यासह आपती व्यवस्थापन, उच्चदाब वितरण प्रणाली अंतर्गत कृषीपंपांच्या वीज जोडण्या, वीज जोडण्यांची नोंदणी आदी विषयाबाबत महावितरण औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक  डॉ. नरेश गिते यांनी व्हीडीओ कॉन्फर्सिंगद्वारे आढावा बैठक घेतली. त्या प्रसंगी ते बोलत होते.

हेही वाचा -कोरोना : शिक्षकांना गृहभेटीसाठी बंधनकारक करू नये, संघटनेची अफलातून मागणी -

कर्मचारी व अभियंत्यांनी मुख्यालय सोडू नयेत.

या बैठकीत डॉ. गिते म्हणाले की, मराठवाडयात घरगुती, व्यापारी व औघोगिक प्रलंबित वीज जोडण्या येत्या आठ दिवसात पूर्ण कराव्यात. अन्यथा वीज ग्राहकांनी वीज जोडणीची मागणी केल्यानंतर पायाभूत सुविधा उपलब्ध असतांनाही वीज जोडण्या देण्यासाठी दिरंगाई करणाऱ्या  शाखा अभियंता, सहायक अभियंता, उपकार्यकारी अभियंता व कार्यकारी अभियंता यांची जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी याप्रसंगी दिले. तसेच प्रशासनाकडून राज्यात आपती व्यवस्थापण बाबत ता. 13 ते 17 आॅक्टोंबर 2020 या कालावधीत वादळी वारा, वादळी पाउस होवून पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अशा प्रसंगी अपघात होवू नये, यासाठी तात्पुरत्या स्वरूपात वीज पुरवठा खंडित करून परिस्थिती पूर्ववत झाल्यानंतर वीज पुरवठा सुरू करावा. या काळात कर्मचाऱ्यांच्या रजा मंजूर करू नयेत. कर्मचारी व अभियंत्यांनी मुख्यालय सोडू नयेत. स्थानिक पातळीवर सतर्क राहून वीज ग्राहकांना सेवा बजावावी अशा सूचना यावेळी त्यांनी दिल्या.

उत्क्रष्ठ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन

तसेच उच्चदाब वितरण प्रणाली अंतर्गत कृषीपंपांच्या वीज  जोडण्या देण्यासाठी कंत्रादारांच्या बैठका घेवून समन्वय साधावा. या वीज जोडण्या देण्यासाठी दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारावरही जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्याचा इशारा त्यांनी याप्रसंगी दिला. वीज जोडणी दिल्यानंतर त्याची महावितरण संगणकीय प्रणालीत नोंद 48 तासात झाली पाहिजे असे सांगून घरगुती, व्यापारी व औघोगिक वीज जोडण्या देण्यात उत्क्रष्ठ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले.  
या बैठकीस औरंगाबाद परिमंडल कार्यालयाचे मुख्य अभियंता भुजंग खंदारे, नांदेड परिमंडलाचे मुख्य अभियंता दतात्रय पडळकर, लातूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप भोळे, अधिक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते यांची उपस्थिती होती.