कोरोना : शिक्षकांना गृहभेटीसाठी बंधनकारक करू नये, संघटनेची अफलातून मागणी

प्रल्हाद कांबळे
Friday, 16 October 2020

बुधवारी (ता. १४) जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात नुकतीच बैठक घेण्यात आली.

नांदेड : सर्व शिक्षक संघटना पदाधिकारी, जिल्हा व राज्य पदाधिकारी यांची आपल्या विविध मागण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली. बुधवारी (ता. १४) जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात नुकतीच बैठक घेण्यात आली. या बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी शरद कुलकर्णी, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, उपशिक्षणाधिकारी बंडू आमदूरकर, कक्ष अधिकारी बळीराम यरपुरवार यांची प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना जिल्हा शाखा नांदेडच्या वतीने निवेदन राज्य कोषाध्यक्ष बालाजी पांडागळे, राज्य उपाध्यक्ष जी. एस. मंगनाळे, जिल्हाध्यक्ष अशोक मोरे, जिल्हा सरचिटणीस बाबूराव माडगे यांच्या स्वाक्षरीचे निवेदनात खालील मागण्या सुपूर्त करण्‍यात आल्या. 

या आहेत मागण्या

इयत्ता पहिली ते चौथी प्राथमिक शाळेला पाचवा वर्ग तर इयत्ता पहिली ते सातवी असणाऱ्या शाळांना आठवा वर्ग जोडण्यात यावा. सर्व शाळेचे निर्गम नोंदी संगणीकरण करण्यात यावे. कोविड-19 अंतर्गत होम कॉरंटाईन झालेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची रजा सेवा काळ ग्राह्य धरण्यात यावा, जिल्हा परिषदेच्या शेष निधीतून 100% विद्यार्थ्यांना मोफत गणवेश द्यावे, विषय शिक्षकांना पदवीधरची शिक्षकांची वेतनश्रेणी देण्यात यावे, किनवट, माहूर तालुका पूर्ण अवघड क्षेत्र घोषित करावे, शिक्षकांना सीपीएम योजना लागू करावी.

हेही वाचानांदेडकरांना दिलासा : कोरोना बाधितांच्या संख्येत आणि मृत्यूदरात घट -

पुरोगामी शिक्षक संघटनेचा पुढाकार

तसेच कोविड-19 मुळे शिक्षकांना गृहभेटीसाठी बंधनकारक करून नये, निवडश्रेणी व वरिष्ठ वेतनश्रेणी यादी तात्काळ काढण्यात यावी, सहाव्या वेतन आयोगाचा पाचवा हप्ता शिक्षकांच्या खात्यात जमा करण्यात यावा, भविष्य निर्वाह निधीचे हप्ते जमा झाल्याचे एसएमएस मिळण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, वैद्यकीय प्रतिपूर्तीचे देयक मंजुरीचे आदेश पंचायत समिती स्थरावर देण्यात यावेत, शाळेचे वीज बिल ग्रामपंचायतीने भरावे, सण अग्रिम दिवाळीपूर्वी वाटप करावे, राहिलेल्या शिक्षकांना सेवेत कायम करावे आदी मागण्या पुरोगामी शिक्षक संघटना नांदेडच्या वतीने निवेदनातील मागण्या यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद येथे जिल्हा सरचिटणीस बाबूराव माडगे यांनी मांडल्या.

येथे क्लिक करामराठवाडा पदवीधर निवडणूक लढवणार- मेस्टा -

पद्मश्री श्यामराव कदम यांना लिंबगावात अभिवादन

नांदेड : सहकारमहर्षी पद्मश्री श्यामराव कदम यांच्या पुण्यस्मरणानिमित्त नांदेड तालुक्यातील लिंबगाव येथील त्यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला व लिंबगाव येथील शेतातील पद्मश्री श्यामरावजी कदम यांच्या समाधीस्थळी कदम परिवार व गावकर्‍यांच्यावतीने पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

पद्मश्री श्यामराव कदम यांचे हे जन्मशताब्दी वर्षे असून गुरुवारी (ता. १५) या दिवशी त्यांचे पुण्यस्मरण असते. त्यानिमित्ताने लिंबगाव येथे पद्मश्री श्यामरावजी कदम यांचा पुर्णाकृती पुतळा असून याठिकाणी गावकरी व कदम परिवाराच्यावतीने पुष्पहार घालून अभिवादन केले. त्यानंतर लिंबगावस्थीत पद्मश्री श्यामराव कदम यांच्या समाधीस्थळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम व कदम परिवाराने अभिवादन केले.

यांनीही केले अभिवादन
 
यावेळी सुभाष कदम, सुरेखा कदम, डॉ. सुनील कदम, डॉ. शीला कदम, डॉ. दत्तात्रय कदम, डॉ. संजय कदम, डॉ. स्मिता कदम, प्रा. पाटील, डॉ. सुधाकर बोकारे, डॉ. प्रकाश पाटील, जयेंद्र पाटील, लिंबगाव तंटामुक्त समितीचे अध्यक्ष भीमराव पाटील कदम, माजी उपसरपंच धोडींबा भालेराव, राष्ट्रवादीचे धनंजय सुर्यवंशी, राष्ट्रवादी काँग्रेस नांदेड शहर उपाध्यक्ष बंटी लांडगे, गणेश तादलापूरकर, राहूल जाधव, कन्हैया कदम, प्रशांत कदम, मनोहर कदम, विजय कदम, दिगांबर पोफळे, प्रशांत गवळे, रत्नाकर सुर्यवंशी आदी जणांनी अभिवादन केले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona: Teachers should not be made compulsory for home visits nanded news