esakal | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे- हरिहरराव भोसीकर
sakal

बोलून बातमी शोधा

अर्धापूर तालुक्यात राष्ट्रवादीची बैठक

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे- हरिहरराव भोसीकर

sakal_logo
By
लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : राष्ट्रवादी काॅग्रेसला शरद पवार यांचे दुरदृष्टी असलेले नेतृत्व लाभले आहे. गेल्या 22 वर्षाच्या वाटचालीत सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी पक्ष ठामपणे उभा आहे. येणा-या काळात स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था, बाजार समितीच्या निवडणूका होणार आहेत. या निवडणुकीच्या कामाला कार्यकर्त्यांनी लागावे आसे आवाहन राष्ट्रवादी काॅग्रेसचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांनी गुरुवारी (ता. दहा) पक्ष कार्यालयाच्या उद्घटनप्रसंगी केले.

अर्धापूर शहर व तालुका राष्ट्रवादी काॅग्रेसच्या बसवेश्वर चौकातील कार्यालयाचे पक्षाच्या स्थापना वर्धापनदिनाचे औचित्य साधून उद्घाटन करण्यात आले.उद्घाटनाचा सोहळा झाल्यानंतर कार्यकर्ता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीच्या आध्यक्षस्थानी प्रदेश सरचिटणीस संतोष गव्हाणे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणुन डी. बी. जांभरुनकर, शेवाळकर, उध्दव राजेगोरे, अॅड सचिन देशमुख, ओमप्रकाश पत्रे, अॅड. सचिन जाधव आदी उपस्थित होते.स्थानिक पदाधिका-याच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.

हेही वाचा - एकदा हे वाचाच : पावसाळ्यात "सर्पदंश" होऊ नये म्हणून काय काळजी घ्याल?

यावेळी मार्गदर्शन करताना भोसीकर म्हणालें की, कोरोनाच्या काळात पक्षाने खुप मोठे काम केले आहे. कोरोनामुळे जे मुल॔ अनाथ झाले आहेत अशा बालकांना मदत करणे, सर्वसामान्य नागरिकांना लस मिळण्यासाठी पुढाकार घेणे तसेच आघाडी शासनाच्या योजना जनसामान्यांपर्यंत नेण्यासाठी गावपातळीवर कार्यकर्त्यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. तसेच येणा-या काळात पदाधिकारी नियुक्ती ,शासकीय कमीट्यावर कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात येतील. अर्धापूर तालुक्यात पक्ष मजबूत करण्यासाठी सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही हरिहरराव भोसीकर यांनी दिली. आभार संदीप राऊत यांनी मानले. यावेळी गजानन माटे, कोंडीबा देशमुख, सुहास देशमुख, अॅड. आमेर, मंजूर अली आदी उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

संपादन- प्रल्हाद कांबळे