"सीसीटीव्ही यंत्रणा कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी सोयीची"

"सीसीटीव्ही यंत्रणा कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी सोयीची"
Summary

यावेळी पोलिस ठाण्यात कार्यान्वित करण्यात आलेल्या उच्च क्षमतेच्या सीसीटीव्ही यंत्रणेचे उद्घाटन श्री. कबाडे यांच्या हस्ते झाले.

तामसा (नांदेड) : पोलिस ठाणे अंतर्गत व परिसरात चाललेल्या घटना घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा पोलिस प्रशासनाला सोयीची ठरते, असे प्रतिपादन अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी केले. (additional superintendent of police vijay kabade said the CCTV system is convenient for the police administration to maintain law and order)

"सीसीटीव्ही यंत्रणा कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी सोयीची"
लातूर - नांदेड महामार्गावर भाजपाचा दोन तास चक्का जाम

गुरुवारी (ता.२४) पोलिस ठाण्याच्या वार्षिक तपासणीसाठी श्री. कबाडे व पोलिस उपअधीक्षक गोपाळराव रांजणकर हे तामसा येथे आले होते. यावेळी पोलिस ठाण्यात कार्यान्वित करण्यात आलेल्या उच्च क्षमतेच्या सीसीटीव्ही यंत्रणेचे उद्घाटन श्री. कबाडे यांच्या हस्ते झाले. सहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक उजगरे यांनी दोन्ही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे स्वागत केले. ठाण्यात उच्चक्षमतेच्या सीसीटीव्ही यंत्रणेला कार्यान्वित करण्यामुळे परिसरातील पाचशे मीटर पर्यंतच्या घडामोडीकडे लक्ष ठेवून नियंत्रण करणे पोलिसांना सोयीस्कर होणार आहे.

"सीसीटीव्ही यंत्रणा कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी सोयीची"
नांदेड जिल्ह्यातील साठवण तलावांची कामे मार्गी लावा- अशोक चव्हाण

हदगाव व हिमायतनगर तालुक्यात पहिल्यांदा तामसा पोलिस ठाण्यात ही यंत्रणा सक्रिय करण्यात आली. पोलिस ठाण्याचा अंतर्गत कारभार पारदर्शी करून परिसरातील अवैध प्रकारांवर लक्ष ठेवून वेळीच प्रतिबंध करण्यासाठी आधुनिक सीसीटीव्ही यंत्रणा फायद्याची ठरणार आहे. पोलिस ठाण्यातील दप्तर तपासणी झाल्यानंतर पोलिस कर्मचाऱ्यांनी परेडद्वारे मानवंदना दिली. ठाणे परिसरात श्री. कबाडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. पोलिस कर्मचारी वसाहत परिसरात गतवर्षी करण्यात आलेल्या मियावाकी घनवन परिसराला भेट देऊन हा प्रकल्प यशस्वीरित्या आकार घेऊन हेतू साध्य होत असल्याद्दल समाधान व्यक्त केले.

"सीसीटीव्ही यंत्रणा कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी सोयीची"
युरियाचा दोन हजार टन बफर स्टॉक; नांदेड कृषी विभागाची माहिती

यावेळी अशोक उजगरे यांनी उर्वरित पाच कॅमेरे लोकसहभागातून सहकार्य घेत शहरातील नवीन बसस्थानक, ग्रामपंचायत परिसर, भुसार बाजारपेठ, डॉ. हेडगेवार मार्केट या भागात कार्यान्वित करण्याचे प्रयत्न होणार असल्याचे स्पष्ट केले. श्री. कबाडे यांनी पोलिसांना महत्त्वाच्या सूचना करीत मार्गदर्शन केले. यावेळी फौजदार लहू घुगे, फौजदार रामराव जेगाडे व पोलिस कर्मचारी उपस्थित होते. (additional superintendent of police vijay kabade said the CCTV system is convenient for the police administration to maintain law and order)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com