बारडचे ग्रामीण रुग्णालय ‘सलाईनवर’

वैद्यकीय अधीक्षकाविना रामभरोसे कारभार ः आरोग्यसेवेचे तीनतेरा
Administration of Bard Rural Hospital started without Medical Superintendent vk11
Administration of Bard Rural Hospital started without Medical Superintendent vk11

बारड - येथील ग्रामीण रुग्णालयाचा कारभार वैद्यकीय अधीक्षकाविना कारभार सुरू असल्याने आरोग्य कर्मचारी वर्गावर नियंत्रण नसून रुग्ण सेवेचा बोजवारा उडाला असून रुग्णालय सलाईनवर असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

याठिकाणच्या नागरिकांना अत्याधुनिक मोफत रुग्णसेवा मिळावी यासाठी तालुक्याच्या दर्जाचे ग्रामीण रुग्णालय उभारले आहे. ग्रामीण रुग्णालय मंजुरीसाठी शासन स्तरावर तत्कालीन आमदार साहेबराव देशमुख बारडकर यांनी पाठपुरावा केला. यानंतर २०१० मध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अत्याधुनिक ग्रामीण रुग्णालयाची उभारणी केली. यानंतर पंचक्रोशीतील सर्वसामान्य नागरिकांना अत्याधुनिक दर्जेदार रूग्णसेवेचा लाभ मिळू लागला.

याठिकाणी वैद्यकीय अधीक्षक, पाच वैद्यकीय अधिकारी, दोन तांत्रिक सहाय्यक, सात आरोग्यसेविका, सात सेवक, याशिवाय औषधी विभाग व बाह्य रुग्ण सेवेत आरोग्य कर्मचारी नियुक्ती करण्यात आली होती. यापैकी तीनच अधिकारी आजमितीस कार्यरत असून दोन जण मात्र शासकीय ‘जावायाप्रमाणे’ कधीतरीच हजेरी लावून पगार मात्र गलेलठ्ठ पगार उचलून शासनाची तिजोरी मात्र खाली करतात.

आजमितीस ग्रामीण रुग्णालयातील वैयक्तिक अधीक्षकच पद रिक्त असल्याने कारभार रामभरोसे दिसून येतो. याशिवाय ग्रामीण रुग्णालयात रक्त तपासणी तसेस एक्सरे सुविधा तातडीने मिळावी यासाठी तज्ज्ञ कर्मचारी नियुक्त असतानाही मध्यान सुट्टीनंतर कर्मचाऱ्यांना घराची आस लागते यामुळे वयोवृद्ध, गोरगरीब, बेसाहारा रुग्णांना मात्र हेलफाटे खावे लागत आहेत.

सात आरोग्य सेविका जागा असताना तीन जागा रिक्त असून सात पैकी दोन सेवक नांदेड रुग्णालयात प्रतिनियुक्तीवर पाठवण्यात आले आहेत. यामुळे रुग्णसेवेचा बोजवारा उडाला आहे. दंतक वैद्यशास्त्राच्या अत्याधुनिक मशिनरी धूळ खात पडून असल्याने त्या विभागाचे वैद्यकीय अधिकारी मात्र वाऱ्यावर आहेत असे बोलले जात आहे. तेव्हा रूग्णालयाचा कारभार आता रामभरोसे असून कोट्यवधी रुपयांची रुग्णालय इमारत मात्र शोभेची वास्तू बनलेली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com