नांदेड : रेल्वेमध्ये पार्सलची सुद्धा ऍडव्हान्स बुकींग करता येणार, नवीन सुविधेचे स्वागत

प्रल्हाद कांबळे
Saturday, 12 September 2020

रेल्वे ग्राहकांकडून ऍडव्हान्स पार्सल बुकिंग ची सुविधा देण्याकरिता वारंवार विनंती करण्यात येत होती जेणेकरून ग्राहकांना पार्सल वाहतूक करण्याकरिता निश्चित जागा मिळू शकेल आणि त्याप्रमाणे ते नियमित  पार्सल वाहतूक  करू शकतील.

नांदेड : भारतीय रेल्वे ने प्रवासी सुविधेत भर घालतांनाच मालवाहतूक आणि पार्सल वाहतूक वाढविण्यास सुरुवात केली आहे. मालवाहतुकीस प्रोत्साहन देण्याकरिता या पूर्वीच विविध सवलती देण्यात येत आहेत. यात पुढे जाऊन पार्सल वाहतुकीस चालना मिळण्याकरिता यापुढे पार्सल वाहतुकी मध्ये नियमित रेल्वे गाड्यांत तसेच टाईम टेबल पार्सल विशेष रेल्वे गाड्या मध्ये यापुढे पार्सल वाहतुकी करिता एस.एल.आर. आणि पार्सल वॅन (वि.पी.) मध्ये जागा ऍडव्हान्स बुक करता येणार आहे.

या सुविधे अंतर्गत १२० दिवस आधी पार्सल वाहतूक करण्याकरिता जागा बुक करता येणार आहे. अपेक्षित पार्सल भाड्याच्या १०% रक्कम भरून  पार्सल करीता  जागा आरक्षित करता येणार आहे. उरलेले ९० % पार्सल भाडे गाडीच्या सुटण्याच्या ७२ तास अगोदर भरावे लागणार आहे. जर ग्राहक ठरल्याप्रमाणे गाडीच्या ७२ तासापूर्वी उरलेले पार्सल भाडे भरू शकला नाही तर ऍडव्हान्स बुकिंगच्या वेळेस भरलेले १०% पार्सल भाडे जप्त केले जाईल आणि पार्सलची ऍडव्हान्स बुकिंग रद्द करण्यात येईल.

हेही वाचाकुठे चाललाय समाज : वंशाला दिवा पाहिजे म्हणून विवाहितेचा छळ -

नियमित पार्सल वाहतूक करू शकतील

रेल्वे ग्राहकांकडून ऍडव्हान्स पार्सल बुकिंग ची सुविधा देण्याकरिता वारंवार विनंती करण्यात येत होती जेणेकरून ग्राहकांना पार्सल वाहतूक करण्याकरिता निश्चित जागा मिळू शकेल आणि त्याप्रमाणे ते नियमित  पार्सल वाहतूक  करू शकतील. यामुळे ग्राहक आणि रेल्वे दोघांनाही फायदा होणे अपेक्षित आहे.

१२० दिवस अगोदर म्हणजेच ऍडव्हान्स बुक करता येणार

या नवीन नियमानुसार  नियमित प्रवासी गाड्यांमध्ये आणि टाईम टेबल पार्सल गाड्यांमध्ये पार्सल वॅन सुद्धा १२० दिवस अगोदर म्हणजेच ऍडव्हान्स बुक करता येणार आहे. याकरिता पूर्वी प्रमाणेच वॅगन डिमांड रजिस्ट्रेशन फीस भरावी लागणार आहे.

येथे क्लिक करा - नांदेड : जिल्हा आरोग्य विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर, कसा तो वाचा?

गाडी सुटण्याच्या ७२ तास पूर्वी त्याला हे रद्द करता येईल

ऍडव्हान्स बुकिंग नुसार पार्सल साठी जागा बुक केलेली जागा जर प्रवाशाला रद्द करावयाची असेल तर गाडी सुटण्याच्या ७२ तासपूर्वी त्याला हे रद्द करता येईल. अशा परिस्थितीतही ग्राहकाला भरलेल्या रकमेच्या ५० % रक्कम परत मिळेल. परंतु ७२ तासानंतर ग्राहकाला असे करता येणार नाही. तसेच काही कारणास्तव जर रेल्वे प्रशासनाने गाडी रद्द केली तर ग्राहकाला त्याने भरलेली पूर्ण रक्कम परत मिळेल.

सामानाकरिता जागा सुरक्षित करावी

श्री उपिंदर सिंघ, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड यांनी ग्राहकांना आवाहन केले आहे कि या संधीचा छोट्या व्यापाऱ्यांनी, व्यावसायिकांनी, शेतकऱ्यांनी  तसेच इतर गरजूंनी पूर्ण फायदा घ्यावा आणि रेल्वेने पार्सल वाहतूक करून आपले पार्सल सुरक्षित आणि गतिशील पद्धतीने पुढे पोहोचवावे. ऍडव्हान्स बुकिंग करून आपल्या सामानाकरिता जागा सुरक्षित करावी आणि आपला व्यवसाय वाढवावा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Advance booking of parcels can also be done in railways, new facility is welcome nanded news