नांदेडला औषधोपचारानंतर दहा हजार रूग्ण झाले बरे... 

अभय कुळकजाईकर
Tuesday, 22 September 2020

नांदेड जिल्ह्यात आत्तापर्यंत दहा हजार रुग्ण औषधोपचारानंतर बरे झाले आहेत. दरम्यान, मंगळवारी (ता. २२ सष्टेंबर) २३२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर उपचार सुरु असताना पाच जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर उपचार सुरु असलेल्यांपैकीर ५१ जणांची प्रकृती अतिगंभीर आहे. 

नांदेड - कोरोनाबाधित रुग्णांना औषधोपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात येत असून मंगळवारी (ता. २२) ३१७ जणांचा समावेश आहे. आत्तापर्यंत नऊ हजार ९७८ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, दिवसभरात नव्याने २३२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर उपचार सुरु असताना पाच जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ५१ जणांची प्रकृती अतिगंभीर आहे. 

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी ही माहिती दिली. मंगळवारी सायंकाळी एक हजार ४४ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ७९० अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर २३२ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यापैकी ८४ अहवाल आरटीपीसीआर तपासणीद्वारे तर १४८ अहवाल ॲन्टीजेन टेस्ट किटद्वारे आले आहेत. त्यामुळे आता रुग्णांची एकूण संख्या १३ हजार ९५५ एवढी झाली आहे. 

हेही वाचा - जायकवाडीपासून पोचमपाडपर्यंतचे प्रकल्प भरले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
 

दिवसभरात पाच जणांचा मृत्यू
आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये नांदेड महापालिका हद्दीतील सर्वात जास्त १२५ आहेत. तसेच नांदेड ग्रामिण, हिमायतनगर, कंधार, हदगाव, माहूर, नायगाव, अर्धापूर, किनवट, बिलोली, भोकर, देगलूर, मुदखेड, लोहा, मुखेड, धर्माबाद या तालुक्यासह हिंगोली, परभणी आणि यवतमाळ जिल्ह्यातील रुग्णाचा समावेश आहे. दरम्यान, पाच जणांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला असून त्यामध्ये नांदेडमधील सिडको पुरुष (वय ७०), जुना कौठा महिला (वय ५५), निवघा (ता. हदगाव) महिला (वय ६०), बेंद्री (ता. भोकर) पुरूष (वय ५४) आणि पलाईगुडा (ता. माहूर) पुरूष (वय ६५) यांचा समावेश आहे. आत्तापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ३६६ झाली आहे. 

दिवसभरात ३१७ रुग्ण बरे
मंगळवारी दिवसभरात ३१७ रुग्णांना औषधोपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यामुळे आत्तापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या नऊ हजार ९७८ झाली आहे. मंगळवारी बरे झालेल्यांमध्ये जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील ७४ रुग्णांचा समावेश आहे. सध्या तीन हजार ५४२ रुग्णांवर जिल्ह्यातील खासगी व शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असून त्यातील ५१ रुग्णांची प्रकृती अतिगंभीर आहे. दरम्यान, उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण ७३.२५ टक्के इतके आहे. 

हेही वाचलेच पाहिजे - जिल्ह्यात लवकरच “ई-ऑफिस” कार्यपद्धतीतून प्रशासनाला गतीमान करु- डॉ. विपीन

नांदेड कोरोना मीटर 

 • एकूण घेतलेले स्वॅब - ७३ हजार ७२९ 
 • एकूण निगेटिव्ह स्वॅब - ५६ हजार ४९६ 
 • एकूण पॉझिटिव्ह रुग्ण - १३ हजार ९५५ 
 • मंगळवारी पॉझिटिव्ह रूग्ण - २३२ 
 • एकूण मृत्यू संख्या - ३६६ 
 • मंगळवारी मृत्यू - पाच 
 • रुग्णालयातून सुटी झालेले रुग्ण - नऊ हजार ९७८ 
 • मंगळवारी सुटी झालेले रुग्ण - ३१७ 
 • सध्या रुग्णालयात उपचार सुरु - तीन हजार ५४२ 
 • अतिगंभीर प्रकृती असलेले रुग्ण - ५१ 
 • प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या - एक हजार १६९

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After treatment in Nanded, ten thousand patients got better ..., Nanded news