तब्बल दोन महिन्यानंतर मिळाला सामान्यांना दिलासा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

कोरोना विषाणूच्या उपाययोजनेसाठी जिल्ह्यात ता. २३ मार्च पासुन शासनाच्या आदेशानुसार लॉकडाउन घोषीत केला होता. यामुळे संचारबंदी जारी करुन जिवणावश्यक वस्तुचे दुकाने वगळता इतर सर्वच बाजार बंद केला होता. यानंतर मात्र टप्याटप्याने काही आस्थापना सुरु करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी दिले होते.

नांदेड : कोरोना विषाणूच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी बंद केलेली जिल्ह्यातील बाजारपेठ तब्बल दोन महिन्यानंतर गजबजणार आहे. रविवारपासुन (ता. २२) सुरु होणाऱ्या दुकानांसाठी संपूर्ण आठवड्यात सकाळी नऊ ते पाच ही वेळ निश्चित केली आहे. यात मात्र गर्दी होणारे ठिकाणांना वगळण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी दिली.

दोन महिन्यापासुन बाजारात शुकशुकाट
कोरोना विषाणूच्या उपाययोजनेसाठी जिल्ह्यात ता. २३ मार्च पासुन शासनाच्या आदेशानुसार लॉकडाउन घोषीत केला होता. यामुळे संचारबंदी जारी करुन जिवणावश्यक वस्तुचे दुकाने वगळता इतर सर्वच बाजार बंद केला होता. यानंतर मात्र टप्याटप्याने काही आस्थापना सुरु करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी दिले होते. या काळात नागरिकांनी नियम पाळल्यामुळे शुक्रवारपासुन (ता. २२) गर्दीची ठिकाणे वगळून बाजार सुरु करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. 

हेही वाचलेच पाहिजे..... ....अखेर शिधापत्रिका नसलेल्यांनाही मिळाला आधार

संचारबंदीत काही काळासाठी सूट
या काळात सकाळी सात ते रात्री सात या काळात संचारबंदीत सूट दिली आहे. यात नागरिकांनी शारीरिक अंतर राखले नाही, तर दुकान बंद व पाच हजार दंड आकारण्याचे निर्देशही दिले आहेत. ग्राहक थांबून राहतील, अशी कोणतीही सेवा देता येणार नाही. फक्त पार्सल सेवा देता येईल. हॉटेल व इतर उपहार गृह यांना किचन सुरू ठेवता येईल असे आदेशात म्हटले आहे. 

हेही वाचा....सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

मास्क वापरला नाही तर लागणार दंड
शारीरिक अंतर ठेवले नाही, थुंकल्यास तसेच मास्क वापरला नाही तर प्रत्येकी एक हजार रुपये दंड लागणार आहे. दुचाकीवर एकाच व्यक्तीला प्रवास करता येइल. ऑटोमध्ये चालकासह इतर दोन व्यक्तींना मुभा दिली आहे तर चारचाकी वाहनात चालक अधीक दोन याप्रमाणे परवानगी दिली आहे. प्रवाशी बसमध्ये पन्नास टक्के क्षमतेने प्रवाशी वाहण्यास परवानगी दिली आहे. लग्न समारंभात उपस्थित राहण्याची मर्यादा वीस व्यक्तीवरून पन्नास व्यक्ती केली आहे.

गर्दीची ठिकाणे मात्र राहणार बंदच
जिल्ह्यातील गर्दीची ठिकाणे मात्र ता. ३१ मे पर्यंत बंदच राहणार आहेत. यात चहा टपरी, पान ठेले, विमान, रेल्वे प्रवास, शाळा, महाविद्यालय, शिकवणी वर्ग (ऑनलाईन व आंतर शिक्षण वगळून) शॉपिंग मॉल, सिनेमा हॉल, सामाजिक/धार्मिक कार्यक्रम, व्यायामशाळा, जलतरणिका, सर्व धार्मिकस्थळे, हॉटेल, रेस्टारंट, बार, धाबे, आठवडी बाजार, शीतपेयांची दुकाने, तंबाखू व तंबाखू जन्य पदार्थाची विक्री बंद राहणार आहे.

एकाच वेळी पाच ग्राहकांना प्रवेश
गर्दी न होणाऱ्या इतर दुकानात एकाच वेळी जास्तीत जास्त पाच ग्राहकांना प्रवेश देता येइल. दोघांमध्ये सहा फूट शारीरिक अंतर राखण्यात यावे. दिलेल्या वेळेत तसेच सुरक्षिततेची काळजी घेवून आस्थापना सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यात नियमांचे उल्लंघन केल्यास दुकानदारांना पाच हजार दंड व दुकान बंद करण्याचा आदेश देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी आदेशात म्हटले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After two months, the common man got relief