सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

आशा ओमप्रकाश चव्हाण (वय ३७) या विवाहितेस तिच्या सासरच्या मंडळींनी जीप खरेदीसाठी दीड लाख रुपये घेऊन ये म्हणून सतत मानसिक व शारीरिक छळ केला. तसेच शिवीगाळ करून उपाशीपोटी ठेवल्यामुळे विवाहितेने मंगळवारी (ता. १९) घरात छताला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

नांदेड : नांदेड शहरातील शिवनेरीनगर येथे राहणाऱ्या आशा ओमप्रकाश चव्हाण (वय ३७) या विवाहितेस तिच्या सासरच्या मंडळींनी जीप खरेदीसाठी दीड लाख रुपये घेऊन ये म्हणून सतत मानसिक व शारीरिक छळ केला. तसेच शिवीगाळ करून उपाशीपोटी ठेवल्यामुळे विवाहितेने मंगळवारी (ता. १९) घरात छताला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी यवतमाळ जिल्ह्यातील अकोला (ता. उमरखेड) येथील माधव मारुती पवार यांच्या फिर्यादीवरून विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा तपास फौजदार लांडगे करीत आहेत.

हेही वाचा....Video - निराधारांना जगण्यासाठी हवाय मदतीचा आधार...

शेतकऱ्याची आत्महत्या
सततची नापिकीमुळे अर्धापूर तालुक्यातील हेळेगाव येथील तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (ता. २१) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. येळेगाव येथील विलास संभाजी कपाटे (वय ३२) हा शेतकरी सततच्या नापिकीमुळे अडचणीत आला होता. यामुळे त्यांने शुक्रवारी घरातील छताला दस्तीच्या सहायाने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी विलास पंडित कपाटे यांच्या माहितीवरून अर्धापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक व्ही. टी. गुट्टे हे करीत आहेत

हेही वाचलेच पाहिजे....नांदेड विभागातील रेल्वे प्रवाशांना अखेर दिलासा.... कसा तो वाचा

पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की
भोकर शहरातील आंबेडकर चौकात तोंडावर मास्क न बांधता दुचाकीवर फिरणाऱ्यांना मास्क न बांधता कुठे जात असे विचारले असता आरोपींनी पोलीसांशी अश्लील भाषा वापरून शिवीगाळ केली. आमची गाडी अडवणारा तू कोण असे म्हणतात खाली पडून धक्काबुक्की केली. तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी पोलीस नाईक ईश्वर बळीराम राठोड यांच्या फिर्यादीवरून भोकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. ही घटना शुक्रवारी (ता. २१) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.

तहसील कर्मचाऱ्यास शिवीगाळ
धर्माबाद तहसील कार्यालयाचे कर्मचारी अवैध गौण खणीज वाहतूकीवर कार्यवाही करण्यासाठी जाताना शेळगाव थडी (ता. बिलोली) येथे आरोपींनी त्यांना अडवून तुम्ही कोण म्हणत शिवीगाळ केली. तसेच अंगावर धावून येवून शासकीय कामात अडथळा आनल्याची घटना मंगळवारी (ता. १९) घडली. या प्रकरणी शिपाइ दत्तात्रय यलप्पा बुन्नोड यांच्या फिर्यादीवरुन कुंडलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सहायक फौजदार श्री इंगळे करीत आहेत.
  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Married woman commits suicide after being harassed by her father-in-law