शेती मशागतीची कामे अंतिम टप्प्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Agricultural Farmers rush to buy seeds and fertilizers

शेती मशागतीची कामे अंतिम टप्प्यात

मारतळा : खरीप हंगाम काही दिवसावर येऊन ठेपला आहे. पूर्वमशागतीच्या कामासह पेरणीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मागील वर्षी मृग नक्षत्रात पेरणी केलेल्या शेतकऱ्यांची पेरणी साधल्यामुळे व यंदा मान्सून वेळेपूर्वीच दाखल होणार असल्याचा हवामान खात्याच्या अंदाज आहे. दरम्यान, ऐनवेळी धावपळ नको म्हणून शेत शिवारात मशागतीची लगबग वाढली आहे. तर दुसरीकडे शेतकरी बि-बियाणे, खते खरेदीसाठी गर्दी करत आहेत.

मारतळा परिसरातील शेतशिवारात सध्या मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आली असून पारंपारिक बैलजोडी व ट्रॅक्टर यंत्राच्या साह्याने मृग नक्षत्र तोंडावर येत असल्याने मशागतीची कामानी वेग घेतला आहे. त्यात पंजी, वखरणी, मोगडा, तिरी आदीसह काडी कचरा वेचणी व शेण खत टाकणी आदी कामे होत आहेत. पिकांच्या उत्तम वाढीसाठी शेणखतही टाकण्यास पसंती दिली जात असून मजूर मिळत नसल्याने शेतकरी कुटुंबातील सदस्यांना सोबत घेऊन शेतातील कामे करत आहेत.

मागील वर्षी परिसरातील मृगाची पेरणी साधल्यामुळे व उत्पन्नही चांगले आले होते. मात्र, यंदा मान्सूनचे आगमन वेळेपूर्वीच होणार या हवामान खात्याचा अंदाजामुळे, ऐनवेळी घाई नको म्हणून शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. तर दुसरीकडे बाजारातील कृषी सेवा केंद्रावर बि-बियाणे, खते खरेदीसाठी गर्दी होत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

गेल्या वर्षी सोयाबीन बियाण्याचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे ऐनवेळी पाऊस होताच धावपळ नको म्हणून शेतकऱ्यांनी यंदा पेरणीपूर्व बी- बियाणे खरेदी करून ठेवण्याकडे कल वाढला आहे .

- रमेश ढेपे, शेतकरी, मारतळा.

Web Title: Agricultural Farmers Rush To Buy Seeds And Fertilizers

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top