नवम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन ‘ऑनलाईन’द्वारे- डाॅ. चारुदत्त पिंगळे 

प्रल्हाद कांबळे
Tuesday, 28 July 2020

वर्ष २०११ च्या जनगणनेनुसार ‘२०६१ मध्ये भारतात हिंदू अल्पसंख्य होतील अशी स्थिती आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर हिंदूंना त्यांचे न्याय्य हक्क मिळण्यासाठी भारताला ‘हिंदु राष्ट्र’घोषित करावे, या प्रमुख मागणीसाठी ‘नवम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी दिली

नांदेड : सेक्युलरपक्षांची सत्ता असणार्‍या राज्यांत सीएए कायदा लागू न करण्याचा निर्णय घेणे आणि हिंदुबहुल भारतात पीडित हिंदूंना न्याय मिळू न शकणे, हा मानवतेचा, तसेच लोकशाहीचा पराभव आहे. वर्ष २०११ च्या जनगणनेनुसार ‘२०६१ मध्ये भारतात हिंदू अल्पसंख्य होतील अशी स्थिती आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर हिंदूंना त्यांचे न्याय्य हक्क मिळण्यासाठी भारताला ‘हिंदु राष्ट्र’घोषित करावे, या प्रमुख मागणीसाठी ‘नवम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी दिली. ‘नवम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’ची माहिती देण्यासाठी मंगळवारी (ता. २८) दुपारी एक वाजता आयोजित ऑनलाईन पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

केंद्रात दुसर्‍यांदा मोदी सरकारच्या स्थापनेनंतर काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनाच्या दृष्टीने कलम ३७० रद्द करणे, नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए), सर्वोच्च न्यायालयाने राममंदिराच्या बाजूने दिलेला ऐतिहासिक निर्णय तसेच पाच ऑगस्ट या दिवशी नियोजित राममंदिराचे भूमीपूजन या सर्व सकारात्मक गोष्टी घडत आहेत. यातील नागरिकत्व सुधारणा कायदा हा ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’ची फलश्रृती आहे. वर्ष २०१४ च्या ‘हिंदु राष्ट्र अधिवेशना’मध्ये अशा प्रकारचा ठराव संमत करण्यात आला होता. 

हेही वाचाजगातील सर्वात मोठ्या निमलष्करी दलाचा वर्धापन दिन साजरा...कुठे झाला ते वाचा....

अधिवेशन ३० जुलै ते दोन ऑगस्ट आणि ता. सहा ते नऊ ऑगस्ट या कालावधीत

डॉ. पिंगळे पुढे म्हणाले, हे अधिवेशन ३० जुलै ते दोन ऑगस्ट आणि ता. सहा ते नऊ ऑगस्ट या कालावधीत सायंकाळी साडेसहा ते साडेआठ या वेळेत ‘ऑनलाईन’पद्धतीने घेण्यात येणार आहे. नवम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात देश- विदेशांतून विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे नेते, कार्यकर्ते, अधिवक्ते, विचारवंत, संपादक, उद्योगपती आदी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

‘कोविड-19’च्या आपत्तीमुळे यंदा हे अधिवेशन ऑनलाईन घ्यावे लागत आहे

अधिवेशनाविषयी अधिक माहिती देतांना हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे म्हणाले की, ‘गत आठ वर्षे गोव्यात होत असलेल्या या अधिवेशनांना खूप मोठा  प्रतिसाद मिळाला; मात्र ‘कोविड-19’च्या आपत्तीमुळे यंदा हे अधिवेशन ऑनलाईन घ्यावे लागत आहे. अयोध्येत राममंदिराच्या भूमीपूजनाला काही ‘सेक्युलर’वादी अडथळे आणत आहेत. याउलट पाकिस्तानात एक मंदिर उभारणेही शक्य नसल्याची स्थिती आहे. पाकिस्तानात मंदिराला स्थान नाही, असे तेथील लोक म्हणत आहेत. हिंदुबहुल भारतात मात्र मशिदींची संख्या वाढत आहे. त्यामुळे आतातरी भारत हे ‘हिंदु राष्ट्र’घोषित व्हायला हवे. हिंदु संघटना आणि संप्रदाय यांनी राष्ट्रहित अन् धर्महित यांसाठी योगदान देणे, तसेच समान कृती कार्यक्रम ठरवणे आणि हिंदुहिताचे ठराव संमत करणे, हे या ‘ऑनलाईन’अधिवेशनाचे स्वरूप असेल.

येथे क्लिक कराGood news : अकोला- अकोट स्थानकादरम्यान ब्रॉडगेज लाईन कार्यान्वित

अधिवेशन सर्वांसाठी खुले असणार 

या वेळी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता चेतन राजहंस म्हणाले, आगामी आपत्काळाच्या दृष्टीने  हिंदूंना सहाय्य करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांना विविध कौशल्ये विकसित करावी लागतील. या सेवाकार्याचे प्रशिक्षण देण्यासाठी ता. १३ ते ता. १६ ऑगस्ट या कालावधीत ‘हिंदु राष्ट्र संघटक अधिवेशना’चे आयोजन करण्यात आले आहे. हे अधिवेशन सर्वांसाठी खुले असणार असून खालील ‘लिंक्स’वर त्याचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. याचा हिंदुत्वनिष्ठांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: All India Hindu Rashtra Convention through 'Online' Dr. Charudatta Pingale nanded news