Video- इतर राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातीलही सर्व धार्मिक स्थळे उघडावीत

प्रमोद चौधरी
Friday, 28 August 2020

इतर राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातीलही सर्व धार्मिक स्थळे सामान्य लोकांसाठी खुली करण्याची मागणी नांदेडच्या सर्व धर्मीय समितीने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. 

नांदेड : केंद्र सरकारने जून महिन्यातच धार्मिक स्थळांना लाॅकडाउनमधून वगळण्याबाबत सूचना दिल्या होत्या. तरीही महाराष्ट्र सरकारने अद्यापपर्यंत धार्मिक स्थळे उघडण्यासाठी परवानगी दिलेली नाही. त्यामुळे सर्व धार्मिक स्थळे सुरु करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी सर्व धर्मिय समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यांत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.  

सर्व धर्मिय समितीजागतिक स्तरावर नांदेड येथील श्री सचखंड गुरुद्वारा प्रसिद्ध आहे. यात्रेकरुंच्या येण्यामुळे बहुतांश व्यवसाय अवलंबून आहेत. महाराष्ट्र सरकारने दारु, गुटखा, माॅल यासारख्या व्यावसायिकांना परवानगी दिली आहे. वास्तविक ही सर्व ठिकाणे गर्दीची आहेत. त्यामुळे सर्व धार्मिक स्थळेही सामान्य लोकांसाठी खुली करण्यास परवानगी देणे आवश्‍यक आहे. 

हेही वाचा - कोरोना उपचार : बारडच्या रुपेश देशमुख यांना कोवी शील्डचा पहिला डोस

दशतीच्या परिस्थितीत आस्था देते धीर
जेव्हा कधी समाजावर नैसर्गिक संकट येतात तेव्हा एकूण सामाजिक मानसिकता ही प्रचंड भयग्रस्त बनते. अशा दहशतीच्या परिस्थितीमध्ये समाजाला त्यांची आस्था धीर देण्याचे व संकटकाळात परिस्थितीशी लढण्याचे बळ देते, हे वास्तव आहे. ही बाब लक्षात घेऊन शासन व जिल्हा प्रशासनाने या संकट काळात रुग्णांना गोळ्या औषधींचे उपचार व इतर आस्तिक जनतेला त्यांच्या त्यांच्या धर्म व आस्थेनुसार उपासना करण्याचे संवैधानिक अधिकाराचे स्वातंत्र्य दिले पाहिजे.

हे देखील वाचाच - पतीच्या अंत्यदर्शनाला मुकली पत्नी, कुठे व का ते वाचा...?

भाविकांमध्ये नाराजीचा सूर
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र शासनाने २४ मार्चपासून देशातील सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवली आहे. दरम्यान केंद्र शासनाने ही सर्व धार्मिक स्थळे सुरु करण्याच्या सूचना जूनमध्येच दिल्या होत्या. काही राज्यांनी आपल्या राज्यातील सर्व धार्मिक स्थळे खुली केलेली आहेत. मात्र, महाराष्ट्र शासनाने अद्यापही यावर निर्णय घेतला नसल्याने, भाविकांमध्ये नाराजीचा सूर आहे.

येथे क्लिक कराच - शैक्षणिक संस्थांचा सक्तीच्या शुल्क वसुलीचा फंडा, कसा? ते वाचाच

राजकीय नेत्यांचेही आहे समर्थन
सर्व धर्मियांचे धार्मिक स्थळे उघडण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर, राज ठाकरे, खासदार इम्तियाज जलिल आदींनी समर्थन केल्याबद्दल त्यांचे समितीच्या वतीने आभार व्यक्त केला आहे. या निवेदनावर कृष्णगुरु बेरळीकर, सोमेशगुरु दांडेगावकर, महेंद्रसिंघ पैदल, सतपालसिंघ लागरी, मुक्ती खालेद शाकेर साहब, मौलाना अजिम रिजवी, भन्तेजी पय्याबोधी, टीएम जाॅर्ज, सुहास पुजारी आदींच्या सह्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: All Religious Places Open In Maharashtra Nanded News