
सगरोळी : बिलोली तालुक्यातील सगरोळी येथील कृषी तंत्रज्ञान महोत्सवात शुक्रवारी (ता. ३१) देखणा व सुदृढ गाढव स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये देगलूर तालुक्यातील आलूर येथील बालाजी मुत्तेपवार यांच्या गाढवाने प्रथम, सगरोळी येथील दत्ता इबितवार व संजय इबितवार यांच्या गाढवाने द्वितीय व तृतीय पारितोषिक मिळवत मान मिळविला आहे.