Crop Loss: लेंडी धरणात नियमबाह्य घळभरणीमुळे मुखेड तालुक्यात महापूर आला, नऊ निष्पाप लोकांचा मृत्यू आणि मोठ्या प्रमाणावर घरं-शेती नुकसान झाले. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
मुक्रमाबाद (जि. नांदेड) : नियमबाह्य घळभरणी झाल्यामुळे मुखेड (जि. नांदेड) तालुक्यातील लेंडी धरणाचे दरवाजे कोंडले गेले. त्यामुळे महापूर येऊन तालुक्यातील हासनाळ, रावणगाव, मुक्रमाबाद भिंगोली भेंडेगाव येथे घरांसह शेतीचे मोठे नुकसान झाले.