
नांदेड - ‘स्त्री’ म्हणजेच सहनशीलतेचे दुसरे नाव, अनेक कडु - गोड अनुभव आणि चटके सहन करत नेहमीच ती यशला गवसणी घालत आली आहे. अशाच काहीसा खडतर अनुभवातुन अंधत्वावर मात करत सुविधाने तिच्या स्वप्नातील सर्वोच्च अशा एसबीआयच्या प्रोबेशनरी ऑफिसर पदावर विराजमान होत यशाला गवसणी घातली आहे.
हिमायतनगर सारख्या गाव खेड्यात जन्म झालेल्या सुविधा सुरेश वाघमारे हिच्या वाट्याला वयाच्या पाचव्या वर्षी अंधत्व आले. जिथे ना तिच्यासाठी शाळा होती ना शिक्षण. वडीलांचा शिक्षकी पेशा असल्याने मुलीच्या शिक्षणासाठी ते धडपडत. इतक्या लहान वयात मुलीसाठी कुठली शाळा निवडायची हा वाघमारे कुटुंबियांसमोरील गंभीर प्रश्न होता. आई वडिलांनी काळजावर दगड ठेवत वयाच्या सहाव्या वर्षीच सुविधाला शिक्षणासाठी वसरणी येथील अंध मुलींच्या शाळेत पाठवले.
सुविधाला राष्ट्रीयकृत बँकेत अधिकारी होण्याचे स्वप्न खुणावत होते
अभ्यासात हुशार असलेल्या सुविधाला दोन वर्षानंतर पुन्हा बोधडी येथील अंध मुलींच्या शाळेत प्रवेश घ्यावा लागला. पुढे तिसरी ते सातवी पर्यंतचे शिक्षण तिने बोधडी येथे राहून पूर्ण केले. परंतु आठवीनंतर मात्र अंध मुलींसाठी जवळपासच्या जिल्ह्यात शाळा उपलब्ध नव्हती. अभ्यासाची पुस्तके वेळेवर मिळत नव्हती. त्यामुळे पुढे तिला सामान्य मुला मुलींप्रमाणेच शाळेत जावे लागणार होते. परंतु शिक्षणात तल्लीन झालेल्या सुविधाला पुढे जाऊन एसबीआय सारख्या राष्ट्रीयकृत बँकेत अधिकारी होण्याचे स्वप्न खुणावत होते. काही झाले तरी ती तिच्या स्वप्नापासून दूर जायचे नव्हते.
तिच्या जिद्दीच्या जोरावर अखेर एसबीआयच्या प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून निवड
सुविधाने हा मनाशीच निश्चय केला आणि यापुढील शिक्षण पुणे येथेच घ्यायचे तिने ठरवले. यासाठी तिने आजीकडे रात्र रडुन काढली. दुसऱ्या दिवशी आजीने औरंगाबादचे उपजिल्हाधिकारी डॉ. भारत कदम यांना ही गोष्ट कळविली आणि डॉ. कदम यांनी भाचीसाठी आळंदी येथील जागृती अंध विद्यालयात प्रवेश मिळवून दिला. तेव्हापासून सुविधाने कधीच मागे वळुन बघितले नाही.
तिचा हिमायतनगर ते गोकुंदा, वसरणी ते पुणे असा थक्क करणारा प्रवास आहे. पुणे येथील अंध मुलींच्या वसतीगृहात राहून दहावीत विशेष प्राविण्य घेवून बीएमसी पुणे येथे बारावी व पदवी पूर्ण केली. दरम्यान, तिची एचएसबीसी बॅक पुणे येथे प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून नियुक्तीही झाली. त्यानंतर तिने एसबीआयमध्ये अधिकारी होण्याची जिद्द कायम ठेवत अहोरात्र मेहनत केली. नुकतीच तिची एसबीआयच्या निवड यादीत प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून निवड झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.