esakal | कोरोनाबाधितांचा गुरूवारी नवा उच्चांक, ६२५ अहवाल पॉझिटिव्ह; तिघांचा मृत्यू 
sakal

बोलून बातमी शोधा

file Photo

गुरुवारी दोन हजार २११ अहवाल प्राप्त झाले आहेत. यामध्ये एक हजार ५४९ निगेटिव्ह आले तर ६२५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील एकुण कोरोना बाधितांची संख्या २९ हजार १४५ इतकी झाली आहे.

कोरोनाबाधितांचा गुरूवारी नवा उच्चांक, ६२५ अहवाल पॉझिटिव्ह; तिघांचा मृत्यू 

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड - जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दररोज नव्याने वाढ होत आहे. गुरुवारी (ता. १८) प्राप्त झालेल्या अहवालात २३६ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली. ६२५ जणांचे स्वॅब पॉझिटिव्ह आले आहेत तर उपचार सुरु असलेल्या गंभीर कोरोनाबाधित रुग्णांपैकी तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्ण व त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना शोधून त्यांचे स्वॅब घेण्यात येत आहेत. बुधवारी (ता. १७) तपासणीसाठी घेण्यात आलेल्या स्वॅबपैकी गुरुवारी दोन हजार २११ अहवाल प्राप्त झाले आहेत. यामध्ये एक हजार ५४९ निगेटिव्ह आले तर ६२५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील एकुण कोरोना बाधितांची संख्या २९ हजार १४५ इतकी झाली आहे. आतापर्यंत २४ हजार ५६५ रुग्ण घरी परतले आहेत. 

हेही वाचा- आशादिप या व्हॅटस्पअप ग्रुपने आणला अनाथ मुलीच्या जिवनात आशेचा किरण

जिल्ह्यातील एकुण मृत्यू संख्या ६२७ 

चौफाळा नांदेड महिला (वय ६०), लेबर कॉलनी नांदेड पुरुष (वय ७८), शिवाजी चौक हदगाव पुरुष (वय ८५) यांच्यावर अनुक्रमे जिल्हा शासकीय रुग्णालय, खासगी रुग्णालय व हदगाव कोविड सेंटरमध्ये उपचार सुरु होते. उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील मृत्यू झालेल्या एकुण रुग्णांची संख्या ६२७ इतकी झाली आहे. 

हेही वाचा- कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारचा ठेंगा

५१ बाधितांची प्रकृती गंभीर 

गुरुवारी नांदेड महापालिका क्षेत्रात - ३६८, नांदेड ग्रामीण - १९, अर्धापूर - १३, मुदखेड - एक, लोहा- ४३, देगलूर - आठ, मुखेड -३६, किनवट- १९, हदगाव - २०, माहूर - सात, उमरी - १२, नायगाव - चार, कंधार - सात, भोकर - पाच, बिलोली - पाच, धर्माबाद - ५०, परभणी - चार, हिंगोली - दोन, यवतमाळ - दोन असे ६२५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या तीन हजार ७२८ बाधितांवर उपचार सुरु आहेत. त्यापैकी ५१ बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत ३२५ स्वॅबची चाचणी सुरु होती. 

नांदेड कोरोना मीटर 

एकुण पॉझिटिव्ह - २९ हजार १४५ 
एकुण बरे - २४ हजार ५६५ 
एकुण मृत्यू - ६२७ 
गुरुवारी पॉझिटिव्ह - ६२५ 
गुरुवारी बरे - २३६ 
गुरुवारी मृत्यू - तीन 
उपचार सुरु - तीन हजार ७२८ 
गंभीर रुग्ण - ५१ 
 

loading image