जयंती विशेष : कल्याणकारी राजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज

राजर्षी शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंत होते. त्यांचा जन्म 1874 साली कागलचे जहागीरदार व कोल्हापूर संस्थानिकाचे आबासाहेब घाटगे यांच्या पोटी झाला.
छत्रपती शाहू महाराज
छत्रपती शाहू महाराज

नांदेड : ता. 17 मार्च 1884 रोजीच शाहू महाराज कोल्हापूरच्या गादीवर दत्तक म्हणून आले. त्यावेळचे महाराजांचे वय होते अवघे 10 वर्षे. महाराजांचे मूळचे गाव कागलचे जहागीरदार जयसिंगराव आबासाहेब घाटगे यांचे ते जेष्ठ चिंरजीव. घाटगे घराणे महाराष्ट्रात पराक्रमामुळे प्रसिध्दीस आलेले.

राजर्षी शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंत होते. त्यांचा जन्म 1874 साली कागलचे जहागीरदार व कोल्हापूर संस्थानिकाचे आबासाहेब घाटगे यांच्या पोटी झाला. कोल्हापूर संस्थानिकाचे चौथे महाराज राजे शिवाजी यांच्या मृत्यूनंतर महाराणी आनंदीबाईंनी 1884 साली दत्तक घेतले. महाराजांनी संपूर्ण आयुष्य समाजाच्या कल्याणासाठी कार्य केले. शाहु महाराजांनी हिंदुस्थानचा इतिहास व भूगोल या विषयाचा अभ्यास केला होता. प्रत्यक्ष इतिहास जेथे घडले तेथे जावून नजरेखाली घातल्यानंतर जाण येणार होती. आपल्या देशाची लोकस्थिती, सामाजिक व आर्थिक विचार यांचाही अभ्यास व्हावा म्हणून त्यांचे गुरु फ्रेझर यांनी अनेक ठिकाणी दौरे सुरु केले. नोव्हेंबर 1980 रोजी उत्तर हिंदुस्थानचा दौरा नाशिकपासून झाला. पुढे बनारस, कलकत्ता, दार्जिलिंग, आग्रा, दिल्ली, अजमेर, मुंबईहून कोल्हापुरास आले. या दौऱ्यादरम्यान नाशिक व बनारस इत्यादी तीर्थ क्षेत्री पुरोहितांनी मांडलेला धर्माचा बाजार पाहिल्यावर त्यांना उबग आली.

ता. 29 जून 2009 रोजी डॉ. जयसिंग पवार यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन प्रसंगी भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील म्हणतात की, राजर्षी शाहू महाराज यांनी सत्तेचा उपयोग लोककल्याणासाठी करणारा महात्मा फुलेंचा खरा वारसदार असा उल्लेख केला आहे. व्यक्तीचा विकास केवळ शिक्षणानेच घडतो असे नाही तर आई- वडील, गुरुजन वर्ग, नातेवाईक, घराण्याच्या परंपरा, अवती- भोवतीचा असलेला समाज, देश स्थिती अशा अनेक बाबी व्यक्तीवर संस्कार घडवित असतात.

हेही वाचा - मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर हुसैन राणा याला २००९ मध्ये अमेरिकेत पकडण्यात आलं होतं.

शाहु महाराजांचे गुरु फ्रेझर (आय. पी. एस.) बुध्दीमान व हुशार होते. जरी शाहू महाराजांचा विवाह त्यावेळेच्या प्रथेनुसार 17 वर्षे होते व राणीसाहेबांचे वय 11 वर्षे होते. परंतु गुरुंनी महाराजाकडून वचन मागितले. राणी साहेबांचे जीवनमान आनंदी रहावे यासाठी ता. 16 डिसेंबर 1891 रोजी वचन दिले.

शाहू महाराजांचा राज्याधिकार प्राप्तीचा दिवस ता. दोन एप्रिल 1894 हा होता. त्यावेळेचे मुंबई इलाख्याचे गव्हर्नर लॉर्ड हॅरीस कोल्हापूरला आले होते. या कार्यक्रमास ब्रिटीश अधिकारी, जहागीरदार, वतनदार, इत्यादी अनेक स्त्री- पुरुष उपस्थित होते. या प्रसंगी प्रजेला उद्देशून एक जाहीरनामा काढला त्यात असे लिहिले होते की, ‘‘आमची सर्व प्रजा सतत तृप्त राहून सुखी असावी, तिचे कल्याणाची सतत वृध्दी व्हावी व आमचे संस्थानाची हर एक प्रकारे सदोदीत भरभराट व्हावी अशी आमची उत्कट इच्छा आहे. हा आमचा हेतू परीपूर्ण करण्यास आमच्या पदरचे सर्व लहान थोर जहागीरदार, आप्त, सरदार, मानकरी, इनामदार, कामगार, व्यापारी आदी करुन तमाम प्रजाजन शुध्द अंतकरणापासून मोठ्या राजनिष्ठेने आम्हा साह्य करतील. अशी आमची पूर्ण उमेद आहे. ही आमची कारकीर्द दिर्घ कालपर्यंत चालवून सफल करावी अशी मी त्या जगन्नियंत्या परमात्म्याची एक भावे प्रार्थना करतो’’. प्रजेचे सुख व कल्याण हेच हिंदवी स्वराज्याचे अंतिम ध्येय होते.

महाराजांनी राज्यरोहनापूर्वी सर्व भागाचा दौरा करून खेड्यापाड्यातील डोंगराळ भागातील गरीब जनतेची अवस्था पाहिली होती. राजवाड्यात न राहता प्रजा जनास भेटत असत. त्यांच्या दु: ख, वेदना याची विचारपूस करीत असत. आणि त्यावर काही मार्ग काढता येतो का यावर सतत विचार करीत असत.

1896- 97 मध्ये देशात भयानक दुष्काळ पडला. लोक अन्नधान्य अभावी मरत असत. गुर ढोरे जगवणे अवघड झाले होते. या भयानक परिस्थितीवर न घाबरता महाराज स्वतः दुष्काळ भागात दौरे करत असत आणि जनतेला दिलासा देत असत. म्हैसूर राज्यातून धान्य मागवून गावागावात स्वस्त धान्य दुकान काढली, एवढ्यावर न थांबता रस्ता तयार करणे, विहिर तलाव खोदणे इत्यादी कामे करवून घेतली. त्यातून लोकांना पैसा मिळाला. तसेच शासकीय जंगल, जमिन जनावरांसाठी खुले केले. अनेक ठिकाणी दुष्काळ निवारण कार्यालय उभी करुन अनेक उपाय योजना सुरु केल्या. या दुष्काळात अपंग, वृध्द, निराधार लोकांसाठी भुकबळी होवू नये म्हणून ‘‘निराधार आश्रम’’ काढले. जवळपास 50 हजार निराधारांनी मदत केली. रोजंदारीवर काम करणाऱ्या महिला मजुराच्या मुलांसाठी ‘‘पाळणाघरे’’ स्थापन केली.

येथे क्लिक करा - सर्व बातम्या वाचण्याबरोबरच त्या ऐकण्याचा आनंद आता तुम्ही 'सकाळ'च्या पॉडकास्टवरुन घेऊ शकता.

1896 साली मुंबई प्रांतमध्ये प्लेगची लागण झाली. हळूहळू परसत 1898 मध्ये कोल्हापूर संस्थानात प्लेगची सुरूवात झाली. कार्य मार्ग काढायचा या बाबत सतत विचार करीत असत. अनेक लोक घर सोडून उघड्या जागेवर, शेतात झोपड्या करून राहू लागले. अशा वेळेस महाराजांनी झोपड्यासाठीचे साहित्य मोफत पुरवले. प्लेगची काळजी कशी घ्यावी या बाबत माहिती सांगत असत. हजारो पत्रे गावोगावी जनजागृतीसाठी पाठवित असत. महाराजांनी एक आदेश काढून प्लेग उपाय योजनेचे जबाबदारी पाटील- कुलकर्णी वतनदार यांच्यावर सोपविली. अंमलबजावणी व्यवस्थित नाही केल्यास त्यांची वतने जप्त करत असत. महाराज नुसते फर्मान काढले नाही तर स्वतः घोड्यावरून 40 मैल जावून प्लेगबाबत लोकांशी चर्चा करीत असत.

कोल्हापूरचे कर्नल रे या पाॅलिटिकल एजंटने महाराजावर विषप्रयोग करण्याचा प्रयत्न केला. 1906 मध्ये काही मंडळींनी मुंबई सरकारकडे अर्ज पाठवून तीन तरूण स्त्रियांना भ्रष्ट केल्याचा आरोप केला. ब्रिटीश सरकारकडून पदावरून दूर करण्याचा प्रयत्न होता. पण तो यशस्वी झाला नाही. ता. 21 मार्च 1908 रोजी महाराजांची कन्या आक्कासाहेब महाराज यांचा विवाह मोठ्या थाटात आयोजन केले होते. गव्हर्नर क्लार्क, मुधोळचा महाराजा, ब्रिटीश आधिकारी, अनेक संस्थानिक उपस्थित रहाणार होते. परंतु अशा प्रसंगी कोल्हापूरातील दामू जोशी, गणपतराव मोडक इत्यादींना पुणे येथून बॉम्ब आणण्याचा बेत केला. परंतु वेळेवर पोहचू न शकल्याने हा अनर्थ टळला.

भारतात हजारो वर्षापासून बहुजन समाज शिक्षणापासून वंचित होता. शिक्षणात मागासलेल्या समाजातील मुलां- मुलींसाठी शाळा काढल्या. राज्यकर्त्यांनी व मिशनरींनी सुरू केलेल्या शाळेतून ब्राम्हण वर्गातील मुले मुली शिक्षण घेत असत, परंतु बहुजनांचा मुलांचा प्रश्न असाच खितपत पडला होता. म्हणून महाराजांनी 18 एप्रिल 1901 मध्ये व्हिक्टोरिया मराठा बोर्डींग (वसतीगृह) ची स्थापना केली. या वसतीगृहासाठी 500 अनुदान दिले. पुढे चालून 47 हजार रुपये वेगळे देवून वसतीगृह सुरु केले.

प्रत्येक समाजासाठी एकूण 24 वसतीगृह सुरु करण्यात आले. व्हिक्टोरिया मराठा बोर्डींग 1901, दिगंबर जैन बोर्डींग 1901, वीरशैव लिंगायत बोर्डींग 1908, मुस्लीम बोर्डींग, मिस क्लार्क बोर्डींग (महार, मांग, ढोर, चांभार मुलांसाठी) , श्री नामदेव बोर्डींग 1911, पांचाळ ब्राम्हण वसतीगृह 1912, इंडियन ख्रिश्चन वसतीगृह 1915, वैश्य होस्टेल 1918, भोई समाज बोर्डींग 1921, नाभिव विद्यार्थी बोर्डींग 1921, ढोर, चांभार होस्टेल 1916, अशा विविध 24 जातीसाठी विविध वसतीगृहाची स्थापना करून विद्यार्थ्यांना अन्न, वस्त्र, निवाराची सुविधा उपलब्ध करून दिली. एवढ्यावरच महाराज थांबले नाही तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही म्हणून प्राथमिक शाळेची सुरूवात केली. राज्यरोहनाच्या वेळी 5 शाळा व 168 मुले होती तर 1907-08 मध्ये 16 शाळा व 416 विद्यार्थी संख्या झाली. तर 1912 पर्यंत 27 शाळा होत्या तर 636 विद्यार्थी होते. 25 जुलै 1917 ला मोफत व सक्तीचे शिक्षण हा कायदा केला.

हे उघडून तर पहा - 2014 मध्ये भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार सत्तेवर आले. नरेंद्र मोदी पंतप्रधान बनले. तेव्हापासून लोकशाही संस्थांवरचे हल्ले प्रत्येक लोकशाहीवादी व्यक्तीला अस्वस्थ करीत आहेत.

अस्पृश्य व्यक्तीवर लावलेला हजेरी पध्दत 27 जुलै 1918 ला मंजुर झाला आणि कोल्हापूर गॅझेटमध्ये 3 ऑगस्ट 1918 रोजी प्रसिध्द झाला. हजेरी निर्मलनाची कारणे बघितली तर गरीब लोकांवर व कामगार लोकांवर अधिकारी वर्ग फुकटची कामे करून घेत असत. म्हणून महाराजांनी महार, मांग, रामोशी व बेरड या चार जातीच्या लोकांची दररोज पोलिस पाटलाकडे हजेरी द्यावी लागत असे. त्या हजेरीच्या पध्दतीचे निर्मुलन केले. तसेच 29 सप्टेंबर 1918 रोजी दुसरे हुकूम गॅझेट काढले. ज्या लोकांना गुन्हेगारीचा कायमचा शिक्का बसलेल्या गट्टेचोर जातीची हजेरी महाराजांनी माफ केल्याचे जाहीर करून शिक्षा झालेल्या कोणत्याही व्यक्तीस शिक्षा संपल्यानंतर पाच वर्षापर्यंत वर्तनात सुधारणा झाल्यास हजेरीतून मुक्त करावे असेही म्हटले आहे. हजेरी प्रमाणेच अस्पृश्य जातींना विशेषतः महार समाजातील व्यक्तींना सरकारी अधिकारी अनेक कामे लावत. पाटील, कुलकर्णी, दशमुख, देशपांडे हे ही मोफत कामे करवून घेत होती. ही एक प्रकारची सामाजिक गुलामगिरीच होती. हे वतन खालसा करून या गुलामगिरीपासून मुक्त केले.

शाहु महाराज यांनी स्त्रियांसाठी देखिल कायदे केले. हजारो वर्षापासून असंख्य जखडलेल्या समस्यांमधून बाहेर काढण्यासाठी इ. स. 1917 मध्ये कोल्हापूर संस्थानात विधवांना पुनर्विवाहास कायदेशीर मान्यता देणारा कायदा संमत केला. तसेच 1919 मध्ये पुरूषांचे वय 18 तर स्त्रियांचे वय 14 वर्षे असावे अशी एक तरतुद केली. एवढ्यावर महाराज थांबले नाहीत तर जो कोणी स्त्रियास क्रुरपणाची वागणूक देईल त्यास 6 महिने कारावास व 200 रू दंड देण्याची तरतुद केली. घटस्फोट व वारसासारखे कायदे पास केले. देवदासी प्रथा बंद केली. राजाराम काॅलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला.

1902 मध्ये 50 टक्के आरक्षणाचा कायदा आणून त्याची अंमलबजावणी आपल्या संस्थानिकात केली. 8 व 10 ऑगस्ट रोजी वटहुकूम काढून तलाठी भरतीत अस्पृष्य वर्गाला प्राधान्य दिले. 6 सप्टेंबर 1919 रोजी जाहीरनामा प्रसिध्द केला. त्यात असे नमुद केले आहे की, संस्थानातील सर्व शासकीय विभागात व सार्वजनिक ठिकाणी कोणीही अस्पृष्यता पाळू नये. दप्तर दिरंगाई व लाच लुचपत हे दोन महाभयंकर रोग प्रशासनाला लागले होते. प्रशासकीय व्यवस्था कोलमडून पडली होती म्हणून महाराजांनी इन्स्पेक्टर ऑफ ऑर्डर ह्या खास अधिकाऱ्यांची नेमणूक केली. जो अधिकारी नियमाचा भंग करील त्यास 15 रुपये दंड केला जात असे. काही अधिकाऱ्यांनी कामावर दिरंगाई केल्यास प्रत्येक दिवशी एक रुपया दंड आकारला जात असे. म्हणून आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत महात्मा फुले, शाहु महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक यांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. म्हणून कानपूर येथील अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय जातीय परिषदेत इ. स. 1919 मध्ये राजर्षी ही पदवी शाहू महाराजांना दिली. अशा या महामानवास 26 जून महाराजांच्या जयंती दिनी महाराष्ट्र शासनाने सामाजिक न्याय दिन साजरा करतात.

लेखक - डॉ. प्रकाश जाधव, प्राचार्य, मानवलोक समाजकार्य महाविद्यालय, अंबाजोगाई जि. बीड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com