Apmc Election : देड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची सत्ता, १८ पैकी १७ उमेदवार विजयी

हमाल मापारी गटातून आपक्षाची बाजी, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा करिष्मा कायम
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण sakal

अर्धापूर : जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पॅनलचे १७ उमेदवार निवडून आले असून हमाल मापारी गटातून आपक्षाने बाजी मारली आहे.नांदेड जिल्ह्यातील राजकारणात पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा करिष्मा कायम असल्याचे या निवडणुकीच्या निमित्ताने सिध्द झाले आहे.तर भारतीय जनता पक्ष व शिवसेने युतीच्या परिवर्तन पॅनलचे स्वप्न धुळीस मिळाले आहे.

या निवडणूकीत काँग्रेसचे बारा, राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन व शिवसेनेचे दोन आसे सतरा उमेदवार विजयी झाले आहेत..या निवडणुकीत माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, भगवानराव आलेगावकर, श्यामराव पाटील टेकाळे, कांग्रेस सरचिटणीस संजय देशमुख लहानकर , गांधी पवार निलेश देशमुख नागोराव आढाव सत्यजीत भोसले, निळकंठ मदने ज्ञानेश्वर राजेगोरे गायत्री गजानन कदम कमलबाई रंगनाथ वाघ आदी उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.

नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत ९८ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.या कृषी उत्पन्न बाजार समितीचे नांदेड, अर्धापूर मुदखेड या तीन तालुक्यात कार्यक्षेत्र असुन या तीन तालुक्यातील मतदान केंद्रावर शुक्रवारी (ता २८) मतदान घेण्यात आले होते.

या मतांची मोजणी नांदेड येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत रविवारी (ता ३०) घेण्यात आली.या मतमोजणी कडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते.मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच महाविकास आघाडीच्या पॅनलनच्या सर्व उमेदवारांनी आघाडी घेतली होती ती शेवट पर्यंत कायम राहिली.मतमोजणीचा अंतिम निकाल येताच महविकास आघाडीच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला.

महाविकास आघाडीच्या पॅनलनचचे विजयी उमेदवार पुढील प्रमाणे सेवा सहकारी सोसायटी गट श्यामराव पाटील टेकाळे(,६८५) भगवानराव पाटील आलेगावकर,(७३०) निलेश देशमुख(६३५) गांधी पवार(,६५१) नागोराव आढाव(६७०) सत्यजीत भोसले(६५२ )भुजंग पाटील डक(७२१)ओबीसी प्रवर्गातून बबनराव बारसे हे बिनविरोध निवड आले आहेत.

भटके विमुक्त प्रवर्गातून निळकंठ मदने(७४९), महिला राखीव गायत्री गजानन कदम(७२८) कमलबाई रंगनाथ वाघ(६६७) , ग्रामपंचायत गटात संजय देशमुख लहानकर(७२९,) गंगाधर शिंदे धनेगावकर(७१८) आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक ज्ञानेश्वर राजेगोरे(८०७) अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून नाना पोहरे (८८०) व्यापारी आडते गट माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा(२९३) सदाशिवराव देशमुख)२४५) हामाल मापारी गटातून शिवाजी दराडे (२५४) ‌‌(अपक्ष) हे विजयी झाले आहे.महाहविकास आघाडीच्या उमेदवारांना सत्तर टक्के मतदान झाले आहे.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी शिस्तबद्ध पद्धतीने प्रचार ‌‌‌‌‌‌यंत्रणा राबविले.त्यांना आमदार मोहन अण्णा हंबर्डे माजी आमदार अमरनाथ राजूरकर, माजी मंत्री डी पी सावंत, भाऊराराचे अध्यक्ष गणपतराव तिडके, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर ,यूवक कांग्रेसचे जिल्हा अध्यक्ष पप्पु पाटील कोंढेकर,

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर, ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख बबनराव बारसे,माधव पावडे, दत्ता पाटील कोकाटे तालुका अध्यक्ष बालाजी गव्हाणे शहराध्यक्ष राजू, तालुका प्रमुख संतोष कल्याणकर, उद्धवराव पवार, यांनी सहकार्य करून एक हाती विजय मिळविला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com